… म्हणून ‘आदर्श’ सूनेच्या वेषात पोहचली अभिनेत्री खा. नुसरत जहाँ संसदेत !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बंगाली अभिनेत्री आणि टीएमसी खासदार नुसरत जहॉं सध्या खूपच चर्चेमध्ये आहे. नुसरत जहॉं संसदमध्ये शपथविधी दरम्यान सिंदूर आणि हातात लाल बांगड्या घालून एकदम नवीन नवरीसारख्या आल्या होत्या. त्यांच्या या वेषामुळे संसदमध्ये खूपच चर्चा झाली होती. यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केला होता. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये खा. नुसरत जहॉं आपल्या वेषाबद्दल चर्चा करताना सविस्तर सांगितले आहे.

Nusrat Jaha-jain
संसदमध्ये उपस्थित झालेल्या प्रश्नावर नुसरत यांनी उत्तर दिले की, ‘माझे २ दिवसांपुर्वीच लग्न झाले होते. त्यामुळे शपथविधीची तारीख पुढे घेण्यात आली होती. लग्नाची तारीख पहिल्यापासूनच फिक्स होती. मी कायदेशीर परवानगी घेतली होती की, मला लग्न करण्यासाठी परवानगी द्या त्यानंतरच मी शपथविधी पुर्ण करेन. मी फ्लाइटमधून बाहेर आले आणि ग्रृहप्रवेश केला. गृहप्रवेशच्या २ तासानंतरच मी दिल्लीमध्ये आले आणि त्यावेळी मी त्या वेषात होते. ‘

Nusrat Jahan
त्या पुढे म्हणाल्या की, ‘मी एका हिंदू मुलासोबत लग्न केले आहे. यावर देखील खूप चर्चा झाली होती. मी बांगड्या घातल्या किंवा सिंदूर लावले. याबद्दल मला काही चुकीचे वाटत नाही कारण सगळ्यात पहिले म्हणजे मी भारतीय आहे आणि मी माझ्या संस्कृतीचा आदर करते. मला आनंद वाटतो की, माझ्या पतीच्या संस्कृतीचा मी आदर करते. शपथविधीच्या दरम्यान मला एवढा वेळ मिळाला नाही की, मी काय घालून संसदमध्ये जावे.’ या व्यतिरिक्त नुसरत यांनी सांगितले की, संसदमध्ये शपथविधी झाल्यानंतर त्यांनी स्पीकरचे पाय धरले होते.

image.png

या गोष्टींवर देखील चर्चा झाल्या होत्या, त्यावर सुद्धा नुसरत यांनी उत्तर दिले होते की, ‘मला माहिती नव्हते की, माझ्या आधी कोणी असे केले असेल. हे खूपच नॅचरल होते. ते माझ्यापेक्षा मोठे आहे, आमच्या संस्कृतीमध्ये शिकवले आहे की, मोठ्यांचा आदर केला पाहिजे. मी त्यांच्याकडे जाणून त्यांचा आर्शिवाद घेतला होता. यानंतर संसदमध्ये एक वेगळे वातावरण निर्माण झाले होते.

आरोग्यविषयक वृत्त –

अंगाला खाज येत असेल तर करा ‘हे’ ५ घरगुती उपाय

सूर्यफुलाच्या बियांपासून ‘हे’ फायदे तर भोपळ्याच्या बिया ‘या’ ४ गोष्टींसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही येतो ‘मेनोपॉज’, तुम्हाला माहित आहे का ?

स्त्रीयांमधील ‘ही’ लक्षणे देतात त्या ‘प्रेग्नेंट’ असल्याचे संकेत

चिकन खाल्यामुळं ‘हे’ आजार ‘कंट्रोल’मध्ये राहतात, जाणून घ्या

सतत सर्दी होणं म्हणजे ‘या’ आजाराचा धोका, वेळीच ओळखा अन् अशी काळजी घ्या

केसांना कलरिंग करताना ‘या’ ४ गोष्टींची जरूर काळजी घ्या

सफरचंद आरोग्यासाठी फायदेशीर, ‘हे’ 7 महत्वाचे फायदे होतात, जाणून घ्या

जांभळातील पोषक तत्वे शरीराच्या ‘या’ 3 भागांना ठेवातात निरोगी, जाणून घ्या सर्वकाही

पाय थंड पडणे, सूज येणे ही गंभीर समस्या, वेळीच ‘हे’ उपचार करा

 

You might also like