Nusrat Jahan गरोदर होण्याच्या वृत्तावर बांगलादेशच्या प्रसिद्ध लेखिका तस्लीमा नसरीन बोलल्या; म्हणाल्या – ‘पतीशी पटत नसेल तर घटस्फोट घ्यावा’

कोलकाता : वृत्तसंस्था – प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री आणि टीएमसी खासदार नुसरत जहां Nusrat Jahan सध्या सोशल मीडियावर जबरदस्त चर्चेचा विषय आहे. तिचे एखादे वक्तव्य किंवा पोस्ट यास कारण नसून तिचे वैयक्तिक जीवन आहे. मीडिया रिपोर्टनुसार नुसरत Nusrat Jahan आणि तिचा पती निखिल जैन यांच्यात काही ठिक चाललेले नाही. असे वृत्त आहे की, ते दोघे डिसेंबर महिन्यापासून सोबत राहत नाहीत. नुसरतने डिसेंबरमध्ये निखिलचे घर सोडले होते आणि ती सध्या आपल्या आई-वडीलांसोबत बालीगंज येथील घरी राहते.

गरोदर आहे टीएमसी खासदार नुसरत जहां ?
काही वेबसाइटने दावा केला आहे की, नुसरत सध्या गरोदर आहे.
मात्र, नुसरतकडून याबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही.
ती काही दिवसांपूर्वी बंगाल विधनसभा निवडणुकीत प्रचार करताना दिसली होती.

अभिनेता यश दासगुप्ता सोबत नुसरतची मैत्री?
काही रिपोर्टमध्ये म्हटले आहे की,
नुसरत सध्या टॉलीवुड अभिनेता यश दासगुप्ताच्या खुप जवळ आहे.
आणि दोघांमधील मैत्रीच नुसरत आणि तिचा पती निखिल जैन यांच्यातील भांडणाचे कारण आहे.

पतीशी मधुरसंबंध नाहीत तर घटस्फोट घ्यावा
प्रसिद्ध परंतु वादग्रस्त बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीनने सुद्धा नुसरत जहां गरोदर झाल्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया दिली आहे.
त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर लिहिले आहे की, नुसरतची बातमी खुपच दिसत आहे.
ती गरोदर आहे. तिचा पती निखिलला याबाबत काहीच माहित नाही.
दोघांना सहा महिन्यापासून वेगळे करण्यात आले आहे.

परंतु अभिनेत्री नुसरतचे यश नावाच्या अभिनेत्यावर प्रेम आहे. त्यालाच लोक मुलाचा पिता मानत आहेत, निखिलला नाही. बातमी बातमी आहे किंवा अफवा माहित नाही, हिच स्थिती राहिली तर निखिल आणि नुसरतचा घटस्फोट होणे चांगले नाही का? वटवाघुळाप्रमाणे कोणत्याही अस्थिर नात्याला लटकण्यात काहीच अर्थ नाही. दोन्ही बाजूंना असुविधा आहे, जर पतीशी पटत नसेल तर घटफोट घेणे चांगले.

सुरूवाती पासून वादात आहे नुसरत-निखिलचा विवाह
जेव्हापासून नुसरत आणि निखिलचा विवाह झाला आहे तेव्हापासून ते लोकांच्या निशाण्यावर आहेत. कट्टरतावाद्यांनी त्यांचे नाते स्वीकारलेले नाही. मंगळसूत्र आणि कुंकू लावून शपथ घेणार्‍या नुसरतविरूद्ध फतवा जारी झाला होता. कोलकातामधील उद्योगपती निखिल जैन यांच्याशी नुसरतचा विवाह 19 जून 2019 मध्ये जैन रितीरिवाजानुसार झाला. एका साडी स्टोअरमध्ये दोघांची भेट झाली आणि प्रेम सुरू झाले होते.

Also Read This : 

Pune News : तळेगाव ढमढेरे येथे दिवसाढवळ्या खून, प्रचंड खळबळ

घरबसल्या ‘ओम’च्या जापाबरोबरच करा हा व्यायाम, फुफ्फुसांमध्ये येईल मजबुती; जाणून घ्या

भाजप कार्यालयाजवळ 51 क्रुड बॉम्ब आढळल्याने खळबळ !

केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहात, तर कोरोना संक्रमणापासून दूर रहा; जाणून घ्या कारण?