home page top 1

प. बंगालमध्ये तृणमूलला भाजपचा ‘झटका’ ; ‘या’ तिसऱ्या आमदाराचा भाजप प्रवेश

कोलकाता : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमुल काँग्रेसला चांगलाच धक्का बसला आहे. त्यानंतर तृणमुल पक्षातील भाजपमध्ये येणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. आता ममता बॅनर्जींना पुन्हा एकदा भाजपने धक्का दिला आहे. एका तृणमूल आमदाराने १२ नगसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.

तृणमूल काँग्रेसचे नोवपारा येथील आमदार सुनील सिंह यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तृणमूलमधून भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये हे तिसरे नेते आहेत. सुनील सिंह हे गरूलीया नगरपालिकेचेही अध्यक्ष आहेत. त्यांनी भाजप प्रवेश करताना आपल्यासह १२ नगरसेवकांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता.

पश्चिम बंगालमध्ये भातपाराकंचरापरानैहातीहलीशहर आणि गरुलीया नगरपालिकेत भाजपचे बहुमत आहे. येथे पूर्वी तृणमूल काँग्रेसची निर्विवाद सत्ता होती. या सत्तेला भाजपने सुरुंग लावला आहे. पश्चिम बंगालमधील जनतेला आता सबका साथ सबका विकास हवा‘ आहे. दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदी यांचे सरकार आहे. आम्हाला देखील राज्यात तेच सरकार तयार करायचे आहेतेव्हाच आम्हाला पश्चिम बंगालचा विकास करणे शक्य होईलअशी प्रतिक्रीया प्रवेशानंतर  आमदार सुनील सिंह यांनी व्यक्त केली.

दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीयप्रदेश नेते मुकुल रॉय यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला.

https://twitter.com/ANI/status/1140575072450764801

Loading...
You might also like