Bengal Assembly Election 2021 : TMC ने दिली निवडणुकीची नवीन घोषणा; ‘बंगालला आपली मुलगी हवीयं‘

कोलकाता : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमध्ये पुढील काही महिन्यांत होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी आता तेथील पक्षांनी कंबर कसली आहे. या निवडणुका होण्यापूर्वी भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधील वाद वाढला आहे.

‘जय श्री राम’ यांच्या घोषणेवरून राज्यात राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर आज तृणमूल काँग्रेसने आपला नवा निवडणूक घोषणा जाहीर केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांचा असा विश्वास आहे की, त्यांच्या घोषणेमुळे मतदार थेट टीएमसीकडे आकर्षित होतील. अन् ममता बॅनर्जी पुन्हा एकदा पश्चिम बंगालमध्ये सत्तेत येतील.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसने ’बांग्ला नीजर मेयकी चाये’ हि नवी निवडणूक घोषणा जाहीर केली आहे. या घोषणेचा अर्थ असा आहे की, बंगाल अपनी बेटी को चाहता है। सुब्रम बक्षी, पार्थ चटर्जी, डेरेक ओब्रायन, शुखेन्दु शेखरू रॉय, काकोली घोष दस्तीदार आणि सुब्रत मुखर्जी यांनी टीएमसीचा हा नारा जाहीर केला आहे. टीएमसीचा हा नारा राज्यभर लावण्यात आला आहे.

बंगाल हा नवा नारा मुलीच्या भावनेशी जोडलेला आहे. याचा फायदा ममता यांना होईल, असा अंदाज लावला जात आहे. बर्‍याच काळापासून बाह्य आणि अंतर्गत राजकारण करणार्‍या तृणमूलने या घोषणेने पुन्हा एकदा निवडणुकांमध्ये नव्याने उत्साह आणला आहे. टीएमसी या घोषणेद्वारे सांगण्याचा प्रयत्न करीत आहे की, ममता ह्याच बंगालची कन्या आहेत. अन् भाजप ही बाह्य सत्ता आहे.

जाणून घेऊ, बंगालमधील निवडणूक समीकरण म्हणजे काय ?
गेल्या लोकसभा निवडणुकीत टीएमसीसाठी मोठी चिंता निर्माण झालेली भाजप गेल्या दीड वर्षांपासून बंगालमधील आपला आधार तयार करण्यात व्यस्त आहे. एक गणित असे म्हणत आहे की, जर ओवेसींचा पक्षाने टीएमसी बरोबर आघाडी केली तर भाजपला फायदा होऊ शकेल आणि काँग्रेसची मुस्लिम मते कापली जातील. दुसरे गणित असे आहे की, मुस्लिम बहुल भागात ओवैसीचा पक्षही भाजप साठी धोकादायक ठरू शकतो.

भाजपने देखील पश्चिम बंगालमध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न केले आहेत. तरीही ममताने भाजपला कडाडून विरोध करून आपले स्थान बळकट केले आहे. आता येणार्‍या निवडणुकीत बंगालमधील जनता कोणत्या गोष्टीकडे पाहून कोणाला सत्ता देईल, हे येणारा काळच सांगेल.