खुशखबर ! ठाणे महानगरपालिकेत होणार 1901 पदांची भरती

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे अनेकांना नोकरीवर पाणी सोडावे लागले आहे. अशातच ठाणे महानगर पालिकेत 1 हजार 901 विविध जागांची भरती निघाली आहे. पात्र असणार्‍या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. 11 जुलै अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.

इन्टेन्सिव्हिस्ट, वैद्यकीय अधिकारी -एमबीबीएस, वैद्यकीय अधिकारी – आयुष, नर्स-जीएनएम, नर्स एएनएम, सिस्टम अ‍ॅडमिनिस्ट्रेटर, बायोमेडिकल इंजिनियरिंग, बायोमेडिकल असिस्टंट, एक्झिक्युटिव्ह हॉस्पिटल ऑपरेशन्स, एचआर मॅनेजर, रिसेप्शनिस्ट, डी ईसीओ टेक्नीशियन, मेडिकल ट्रान्सक्रिप्शनिस्ट, एक्स-रे टेक्नीशियन, डायलिसिस तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, सीएसएसडी तंत्रज्ञ, एमजीपीएस तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, हार्डवेअर व नेटवर्किंग अभियंता पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणार्‍या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.