हिवाळ्यात निमोनियापासुन बचाव करण्यासाठी नक्की ‘या’ 5 गोष्टींचं सेवन करा, जाणवणार नाही ‘थंडी’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हिवाळ्यात न्यूमोनियासारखा आजार कोणालाही होऊ शकतो. जर वेळेत लक्षणे ओळखली गेली नाहीत तर त्यामुळे फुफ्फुसांना संसर्ग होऊ शकतो. या रोगाचा संसर्ग होऊ नये म्हणून बदलत्या हवामानानुसार आपल्या शरीराच्या प्रतिकारशक्तीकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. जाणून घ्या अशा 5 गोष्टींबद्दल ज्या तुमच्या शरीरातील रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मदत करून हिवाळ्यात न्यूमोनियाचा प्रतिबंध करतात.

१) हळद
Image result for हळद
हळदीचे अँटीव्हायरल आणि अँटी-बॅक्टेरियाचे गुणधर्म न्यूमोनियाच्या संक्रमणास प्रतिबंध करतात. न्यूमोनिया टाळण्यासाठी दुधात हळद टाकून प्या. तसेच एक ग्लास कोमट पाण्यात हळद आणि मिरपूड पावडर मिसळून पिऊ शकता.यामुळे श्वास घेण्यास येणारी अडचण कमी होते आणि मूत्रपिंड निरोगी राहण्यास मदत होते. हळद कफदेखील कमी करते.

२) तुळस
Image result for तुळस
तुळशीमध्ये उपस्थित अँटी फंगल आणि अँटी व्हायरल गुणधर्म न्यूमोनियापासून संरक्षण करतात. त्यात उपस्थित युजेनॉल सर्दी, खोकला देखील बरा करण्यास फायदेशीर ठरते. दररोज रिकाम्या पोटी तुळशीची पाने खाणे फायद्याचे आहे. सर्दी टाळण्यासाठी, तुळशीच्या पानांचा रस काढा आणि त्यात काळी मिरी घाला. सकाळी आणि संध्याकाळी तो प्या. तुळशीचा चहा पिणे देखील फायदेशीर आहे.

३) मेथीदाणे
Image result for मेथीदाणे
मेथीदाणे शरीरातील साठलेले विष काढून टाकते आणि न्यूमोनियासारख्या आजारांपासून संरक्षण करते. अर्धा चमचे मेथीचे दाणे एका ग्लास पाण्यात भिजवा. आणि सकाळी प्या. याऋतूत मेथीचा चहा देखील प्रभावी आहे.

४) लसूण
Image result for लसूण
लसणामधील मॅंगनीज, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, सेलेनियम आणि फायबर हे व्हायरल आणि बुरशीजन्य संक्रमणापासून बचाव करतात. लसूण शरीरात रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याचे कार्य करते. न्यूमोनिया होऊ नये म्हणून दररोज रिकाम्या पोटी लसणाची कळी खा. लसूण मधासह खाणे देखील फायदेशीर आहे.

५) आले
Image result for आले
आल्यामध्ये असणारे घटक विशेषतः हिवाळ्यात न्यूमोनियासारख्या बर्‍याच रोगांपासून संरक्षण करतात. आल्यामध्ये असणारे अँटीफंगल आणि अँटीबॅक्टरीअल घटक कफ आणि सर्दीपासून संरक्षण करते. सर्दी टाळण्यासाठी दररोज आल्याचा चहा प्या. आल्यासोबत मध खाल्ल्यानेही फायदा होतो.

Visit : Policenama.com