Coronavirus : ‘कोरोना’चा प्रादुर्भात रोखण्यासाठी ‘या’ राज्यानं उचललं अनोखं पाऊल, 30 जूनपर्यंत च्युईंगम बंदी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – देशभरात कोरोनाचा वाढता वेग कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी जनजागृतीसह विविध माहिती नागरिकांपर्यंत पोहोचलविली जात आहे. तरीही दररोज रस्त्यावर भटकंती करणार्‍यांची संख्या कमी होत नाही. त्यामुळे कम्युनिटी संसर्ग वाढत चालला आहे. दुसरीकडे कोरोनाला थोपविण्यासाठी हरिणाना राज्यात 30 जूनपर्यंत च्युईंगम बंदी करण्यात आली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हरयाणा राज्यात 30 जूनपर्यंत च्युईंगम बंदी करण्यात आली आहे.

हरयाणाच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने ही माहिती दिली. विक्री आणि खरेदीवर बंदी घालण्यात आली आहे. च्युईंगम चघळण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. 30 जूनपर्यंत ही बंदी घालण्यात आल्याचेही हरयाणाच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने सांगितले आहे. च्युईंगम चघळून थुंकले तर कोरोनाचा प्रसार वाढण्यासाठीचे कारण ठरु शकते. त्यासाठीच खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता तरुणांना च्युईंगम खाता येणार नाही.