पोलिस दंड करतील म्हणून ‘या’ व्यक्तीनं केलं असं काही की पोलिस झाले ‘हैराण-परेशान’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या देशात मोटर वाहन कायदा लागू झाल्यापासून वाहतूक नियम कठोर करण्यात आले आहे, आणि हे नियम मोडणाऱ्यांना भरमसाठ दंड सोसावा लागत आहे. अनेकदा गाडीच्या किंमतीपेक्षा अधिक दंड भरावा लागल्याच्या घटना आहे. त्यामुळे वाहन चालक वैतागले आहेत. त्याचबरोबर सरकारच्या या निर्णयामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात धास्तावले असून या खिसेकापू दंडामुळे धास्तावले असून नागरिक या दंडापासून वाचण्यासाठी मोठ्या प्रमाणात सावधानता बाळगत आहे.

एका व्यक्तीने मात्र या दंडापासून वाचण्यासाठी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या नावाने आपल्या गाडीची नंबरप्लेट बसवली असून याचे फोटो सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आमदारांच्या नावाच्या स्टिकरचा देखील काहीजण या दंडापासून वाचण्यासाठी वापर करताना दिसून येत आहेत.

या व्यक्तीने गाडीच्या नंबर प्लेटवर ‘एपी सीएम जगन’ असे लिहिले होते. इतकेच नाही तर कारच्या दोन्ही नंबर प्लेटवर हे नाव लिहलेले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 ऑक्टोबर रोजी नियमितपणे वाहनांची तपासणी करत असताना पोलिसांनी एका वाहनाला अडवले. या गाडीचा मालक एम हरि राकेश असून तो गोदावरी जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्यावेळी त्याने दंडापासून वाचण्यासाठी असे केल्याचे पोलिसांना सांगितले.

गाडी जप्त केली
या प्रकरणामुळे पोलिसांनी त्याची गाडी जप्त केली असून त्याच्याविरुद्यज कलम 420 आणि 210 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे आता त्याच्यावर काय कायदेशीर कारवाई होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Visit : Policenama.com