‘या’ 2 राशींच्या लोकांनी बांधू नये काळा दोरा, सुरू होऊ शकतो ‘अशुभ’ काळ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वाईट नजरेपासून किंवा वाईट शक्तीपासून वाचण्यासाठी आपल्याकडे अनेकदा काळा धागा बांधण्याचा सल्ला दिला जातो आणि तशाप्रकारचे अनेक समाज गैरसमज आपल्याकडे प्रसिद्ध देखील आहेत. त्यामुळे खरंच प्रत्येकाने काळा धागा बांधला पाहिजे का ? अशी शंका अनेकांच्या मनात असेल.

काळा धागा न केवळ वाईट नजरेपासून वाचवतो तर शनी ग्रहाला देखील मजबुती देतो. ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींपैकी दोन रास अशा आहेत ज्यांना काळा धागा अनुकूल नाही. या दोन राशींपैकी एक राशी मेष आहे तर दुसरी वृश्चिक आहे. या दोनीही राशींचा मंगळ शी संपर्क आहे आणि मंगळला काळा रंग आवडत नाही. मंगळ ला लाल रंग प्रिय आहे.

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार मेष आणि वृश्चिक राशीचे लोक जर काळा धागा घालत असतील तर त्यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. अशा प्रकारच्या व्यक्तींना निर्णय घेण्यासाठी असक्षमता येते. काळ्या धाग्यामुळे बेचेनि वाढते आणि जीवनात अयशस्वी होण्याचा हेच कारण जबाबदार ठरते. त्यामुळे या राशीतील व्यक्तींनी कधीही काळ्या रंगाचा धागा घालू नहे.

तूळ, मकर आणि कुंभ राशीसाठी मात्र काळ्या रंगाचा धागा घालणे खुप लाभदायक ठरणार आहे. तूळ ही शनीची उच्च रास आहे तर मकर आणि कुंभ राशीचा मालक शनी आहे त्यामुळे या राशींच्या व्यक्तींनी काळा धागा घातल्याने त्यांना नोकरीमध्ये यश मिळवता येईल. काळ्या रंगाच्या धाग्यामुळे यांच्या जीवनातील दारिद्रय दूर होईल.

Visit : Policenama.com