श्रीमंत होण्यासाठी अभिनेत्रीने बनवले साधू-बाबासोबत शारिरीक संबंध आणि पुढे झाले असे काही…

छत्तीसगड : वृत्तसंस्था – अभिनेत्री आणि मॉडेल आंचल यादव हत्याकांडाचा तापस करत असताना आता पोलिसांनी राजधानीतील आंचलच्या व्हीआयपी रोडवरील फ्लॉवर व्हॅलीमधल्या घरावर लक्ष केंद्रीत केले आहे. या घराची तपासणी केल्यानंतर अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. तिच्या घरात काही हार्ड ड्राईव आणि चीप्स मिळाल्या आहेत. याच तपासात आंचलचे बाबासोबत संबंध असल्याचे पुरावेही समोर आले आहेत.

आंचलला प्रसिद्धी मिळवायची होती. त्यामुळे तिने या बाबाची मदत घेतली होती परंतु काही दिवसांनंतर तिला समजले की, सदर बाबा खोटा आहे. यानंतर तिने दिल्लीतील पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. आंचलने लिखीत तक्रार केली नव्हती परंतु दोन महिन्यांपूर्वी आंचलने अनेक पोलीस अधिकाऱ्यांना भेटून या प्रकाराबद्दल सांगितले होते. लिखित तक्रार नसल्याने  पोलिसांना पुढचा तपास करता आला नाही.

दरम्यान, पोलीस तपासात आंचल हत्याकांडासंबधीचे महत्त्वाचे पुरावे हाती लागल्याचे समजत आहे. परंतु पोलिसांनी याबाबत काहीही वक्तव्य केलेले नाही. परंतु येत्या काही दिवसांतच या प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. सध्या पोलिसांनी याप्रकरणी 3 संशयितांना ताब्यात घेतले अशून त्यांची चौकशी केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.