लयभारी ! तुम्ही ‘सर्च’ केलेली ‘इन्फो’ खरी की खोटी? Google देणार संपूर्ण डिटेल्स, जाणून घ्या नवीन ‘फीचर’बद्दल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्याच्या इंटरनेटच्या जमान्यात अनेक न्यूज व्हायरल होत असतात. त्यापैकी काही न्यूज फेक न्यूजही असतात. परंतु आता ट्विटर, फेसबुक पाठोपाठ गुगलनेही फेक न्यूजला आळा घालण्यासाठी प्रयत्न करत आहे. आता Google ही एक नवे फीचर लाँच करणार असून यातून युजर्सला फेक न्यूजबाबत माहिती मिळणार आहे. यावर्षाच्या अखेरीस हे फीचर सर्व युजर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सुरुवातीला हे फीचर केवळ इंग्रजी भाषेच्या रिझल्टसाठी काम करेल.

गुगलने नुकतेच About this Result फीचरची घोषणा केली आहे. हे फीचर गुगल सर्च केलेल्या गोष्टीच्या sources बाबत माहिती देईल. त्याशिवाय ज्या वेबसाईटची ती लिंक आहे, ती किती विश्वासार्ह आहे. याची माहिती युजर्सला देेईल. यासाठी गुगल इनसायक्लोपीडिया Wikipedia सोबत काम करत आहे. या फीचरद्वारे युजर ज्यावेळी गुगलवर एखादी माहिती सर्च करेल. त्यावेळी नेहमीप्रमाणे अनेक वेबसाईट्सच्या लिंक ओपन होतील. त्यानंतर युजरला लिंकच्या बाजूला असलेल्या तीन डॉट मेन्यूवर क्लिक करावे लागणार आहे. ती वेबसाईट सुरक्षित आहे की नाही याची माहिती Google देईल. त्यानंतर वेबसाईटची माहिती विकीपीडियावर उपलब्ध आहे की नाही, जी लिंक तुम्ही वाचत आहात, ती Paid तर नाही ना अशा गोष्टींची माहिती गुगल देईल. गुगल तुम्ही सर्च केलेली माहिती नेमकी कुठून येत आहे. याबाबत सांगेल, त्यामुळे युजरला त्या साईटवर किती विश्वास ठेवावा हे समजण्यास मदत होणार आहे. हे फीचर अमेरिकेत यावर्षाच्या सुरुवातीला फेब्रुवारीमध्ये लाँच केले होते. आता यावर्षाच्या अखेरीस हे फीचर सर्व युजर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.