तुमच्या पाठीवर सुद्धा आहेत का मुरुम ? सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती उपाय, ‘ही’ 8 कारणे जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – अनेक लोकांना पाठीवरील मुरुम (back acne )असण्याची समस्या असते. जर तुमच्यात सुद्धा मुरुम म्हणजेच बॅक अ‍ॅक्नेची समस्या असेल तर घरगुती उपाय करून यापासून सुटका मिळवू शकता. ही समस्या का होते आणि यावरील घरगुती उपाय जाणून घेवूयात…

बॅक अ‍ॅक्नेची ही आहेत कारणे
1 स्कीन ऑयली असणे
2 जास्त घाम येणे
3 कॉस्मेटिक्सचा जास्त वापर करणे
4 ऑईल मसाज अणि व्हॅक्सीन
5 औषधांचा साईड इफेक्ट्स असू शकतो
6 हार्मोन्समध्ये बदल. एण्ड्रोजन हार्मोनचा स्तर वाढणे
7 असंतुलित आहार. जास्त ऑयली, जंक फूड, फास्ट फूड खाणे.
8 अनुवंशिक असणे

हे घरगुती उपाय करा
1 हळद-गुलाब जल
दोन-तीन चमचे हळदीत थोडे गुलाब जल मिसळा आणि घट्ट पेस्ट तयार करा. या पेस्टचा बॅक अ‍ॅक्ने लेप लावा. अर्धा तासानंतर आंघोळ करा.

2 टी ट्री ऑईल-खोबरेल तेल
अर्धा छोटा चमचा टी ट्री ऑईल घ्या. यामध्ये एक चमचा खोबरेल तेल मिसळा. चांगले मिसळून पाठीवर कापसाने लावा. वीस मिनिटानंतर आंघोळ करा.

3 एलोवेरा जेल-हळद
दोन चमचे एलोवेरा जेल घ्या आणि यामध्ये एक चिमुट हळद पावडर मिसळा. हे दोन्ही एकत्र मिसळून घट्ट पेस्ट बनवा. याचा लेप पाठीवर लावा आणि अर्धा तासाने आंघोळ करा.

4 लिंबू
लिंबाची पाने स्वच्छ धुवून वाटून घ्या, घट्ट पेस्ट बनवा, या पेस्टचा लेप पाठीवर लावा. अर्धा तासाने आंघोळ करा.

5 ग्रीन टी
एक चमचा ग्रीन टी एक कप गरम पाण्यात टाकून दहा मिनिटे ठेवा. नंतर हे गाळून कॉटन बॉलच्या मदतीने पाठीवरील मुरूमांवर लावा. अर्धा तासाने आंघोळ करा.

पोटाची चरबी कमी करायची असेल तर आहारात समाविष्ट करा ‘ही’ 5 फळे, जाणून घ्या

कायम राहणार ‘Lockdown’ ! राज्यात टप्प्याटप्प्याने शिथीलता, CM ठाकरेंनी दिले संबंधित विभागास ‘हे’ निर्देश

पोटाची चरबी कमी करायची असेल तर आहारात समाविष्ट करा ‘ही’ 5 फळे, जाणून घ्या

‘मराठा आरक्षणाबाबतची भाजपची दुतोंडी भूमिका पुन्हा एकदा चव्हाटयावर’