#YogaDay 2019 : तुम्हाला तुमची ‘उंची’ वाढवायचीय, मग फक्‍त ‘हे’ असान कराच

पोलिसनामा ऑनलाईन टीम – मी मोठा होत असताना माझ्या उंचीलाच काय झाले ? हे जग आणखी थोडे चांगले दिसावे म्हणून बुटक्या व्यक्तींना असे वाटत असते कि, त्यांची उंची आणखी थोडी जास्त असायला हवी होती. म्हणून उंच व्हायला काय उपाय आहेत. अशा प्रकारचे उपाय कोठे आहे ? मग उंची वाढण्याचे काही नैसर्गिक उपाय आहेत कां ? अशा प्रश्नांच्या शोधात आपण असतो.

परंतु योगासनातील ताडासन प्रकारामुळे चक्क तुमची उंची वाढू शकते. ताडासन नियमित केल्याने उंची वाढते, बाल कुमार, तसेच किशोरवयीन मुलांसाठी हे आसन खूप लाभदायक आहे. सुरवातीला अर्धा मिनिट हे आसन करावे असे पाच ते दहा वेळा करावे.

योगामुळे तुमच्या पाठीचा कणा ताणतो, पाठ आणि पायाचे स्नायू ताणले जातात आणि तुमची अंगकाठी सुधारून उंची वाढणे शक्य आहे. योगामुळे शरीरातील विषारी द्रव्यांचा निचरा होऊन निरोगी पेशींच्या वाढीस चालना मिळते. नियमित योग साधना तणाव नाहीसा करून विश्राम देते. अंतिमतः शरीरातील संप्रेरकांचे स्त्रवणे वाढून उंची वाढते.

कसे कराल ताडासन ?

प्रथम सरळ दोंन्ही पायांवर सारखा भार टाकून उभे रहा ,शरीर स्थिर ठेऊन पाय जुळलेल्या अवस्थेत ठेवा. हळुवार श्वास घेत दोन्ही हात वरच्या दिशेला घेऊन जा त्यानंतर चवड्यावर उभे राहून तो सांभाळा. काही काळ असेच श्वास कोठेही रोखून न धरता पुन्हा सावकाश पूर्वस्थितीत या.

ताडासन केल्याचे फायदे ?

पाठीचा कणा ताठ आणि उंच बनतो.
गुडघे आणि मांड्या मजबूत बनतात.
शरीराची ढब सुधारते.
शरीराचा समतोल सुधारून तुम्ही स्थिर आणि लवचिक बनता.
बौद्धिक समन्वय सुधारतो.
श्वास स्थिर, खोल बनतो.

आरोग्यविषयक वृत्त

शरीराचे ‘तो’ भाग दाबल्याने दूर होतात अनेक समस्या

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय जरूर करा

कांदा व लसूण एकत्र खा, होतील ‘हे’ फायदे

पेस्ट कंट्रोल पेक्षा हे उपाय करा, किटक जातील पळून

संध्याकाळीहीकरू शकता व्यायाम, सकाळ एवढाच फायदेशीर

केस पांढरे असतील तर आहारात करा ‘हा’ बदल

 

सिने जगत –

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला शाहिद कपूरसोबत ‘रात्र’ घालवायचीय !

Loading...
You might also like