1971 च्या युद्धातील योद्ध्यांच्या सन्मानासाठी BSF चे जवान 11 तासांपेक्षा कमी वेळात 180 KM धावले, पहा व्हिडिओ

अनूपगढ : भारत-पाकिस्तानमधील 1971 च्या लढाईतील योद्ध्यांना सन्मानित करण्यासाठी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी अंतरराष्ट्रीय सीमेवर मध्यरात्री (13/14 डिसेंबर) 180 किलोमीटरची रिले रेस केली. राजस्थानच्या अनूपगढमध्ये 11 तासांपेक्षा सुद्धा कमी वेळेत शर्यतीचा समारोप झाला.

अनूपगढमध्ये या निमित्त केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी म्हटले, देशविरोधी शक्तींना या गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी की, 1971 पेक्षा जास्त आज भारताचे लष्कर आणखी सक्षम झाले आहे, यासाठी बीएसएफच्या 900 पेक्षा जास्त सैनिकांनी रात्री 12 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत 180 किमीचे अंतर धावत पूर्ण केले.

यासोबतच त्यांनी सोमवारी म्हटले की, आज, श्रीगंगानगरमध्ये 1971 च्या भारत-पाक युद्धातील विजयी आठवणींसाठी भारतीय लष्कराने युद्धवीरांच्या सन्मानासाठी सीमा सुरक्षा दलाद्वारे अनूपगढमध्ये आयोजित केलेल्या सोहळ्यात सहभागी झाल्याने गर्व वाटला. शौर्याला सन्मानित करणार्‍या या कार्यक्रमात मला सहभागी केल्याबद्दल मनापासून आभार!

1971 च्या भारत-पाक युद्धावर तयार चित्रपट ‘बॉर्डर’मध्ये अभिनेता सुनील शेट्टीने ज्या भैरोसिंह यांची भूमिका केली होती, त्यांची सुद्धा गजेंद्र सिंग यांनी भेट घेतली. त्यांनी ट्विट करून म्हटले की, 1971 च्या भारत- पाक युद्धावर आधारीत चित्रपट बॉर्डरमध्ये अभिनेता सुनील शेट्टीने केलेली भूमिका ज्या शूर जवानाची होती, आज त्या भैरोसिंह यांना भेटण्याची संधी मिळाली. त्यांच्या सोबतच या युद्धातील अन्य शूर जवानांना सन्मानित करण्याचा अनुभव हृदयस्पर्शी होता. जय हिंद! जय हिंद की सेना!

आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी म्हटले, 1971 मध्ये भारत-पाकिस्तानच्या मध्यावर झालेल्या युद्धात शौर्य आणि आकलनाने शत्रूची रणनिती उद्ध्वस्त करताना शहीद झालेले पराक्रमी योद्धा फ्लाईंग ऑफिसर निर्मलजीत सिंह सेखों, परमवीर चक्र यांना पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी प्रणाम!