Airtel, Vodafone-Idea च्या ग्राहकांसाठी ‘बॅड न्यूज’, बदलला नाही ‘हा’ नियम

पोलीसनामा ऑनलाईन टीम : काही दिवसांपूर्वीच रिलायन्स जिओ, व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेलने आपले प्रीपेड प्लॅन्स महाग केले आहेत. त्यानुसार प्रत्येक प्लॅनच्या दरामध्ये ४० ते ५० टक्के वाढ करण्यात आली. कंपन्यांच्या या दरवाढीमुळे ग्राहकांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. त्यामुळे, एअरटेल आणि व्होडाफोनने आपल्या ग्राहकांना दिलासा देत अन्य नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सेवा उपलब्ध करून दिली. मात्र, जिओ अद्यापही आपल्या युजर्सकडून इतर नेटवर्कवर कॉल करण्यासाठी ६ पैसे प्रति मिनिट आकारत आहे. मात्र, जरी एअरटेल, व्होडाफोन-आयडियाने ग्राहकांना दिलासा दिला असला तरी या कंपन्यांच्या ग्राहकांसाठी ‘बॅड न्यूज’देखील आहे. कारण, प्रीपेड प्लॅन महाग केल्यानंतरही एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया कंपन्यांनी ‘मिनिमम रिचार्ज पॉलिसी’ बंद केलेली नाही.

दरम्यान, टॅरिफ दरवाढीनंतर मिनिमम रिचार्ज पॉलिसी बंद होईल, अशी शक्यता होती. मात्र, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाच्या ग्राहकांना आपले प्रीपेड मोबाइल नंबर सुरू ठेवण्यासाठी दर महिन्याला रिचार्ज करणं बंधनकारक असणार आहे. त्यामुळे, फ्री इनकमिंगची सेवा तुम्हाला मिळणार नसून त्यसाठी तुम्हाला दर महिन्याला किमान एकदा रिचार्ज करावे लागणार आहे. अन्यथा आपल्या इनकमिंग कॉल्सची सेवा बंद करण्यात येईल.

नवे टॅरिफ प्लॅन लागू झाल्यानंतर एअरटेलने मिनिमम रिचार्जसाठी २३ रुपये तर व्होडाफोन-आयडिया या कंपन्यांनी २४ रुपयांचा रिचार्ज करणे अनिवार्य केले आहे. यासोबतच ४९ रुपये आणि ७९ रुपयांचा प्लॅनही उपलब्ध आहे. मात्र, या तिन्ही प्लॅनमध्ये ग्राहकांना डेटा, टॉक टाइम किंवा एसएमएस सेवा मिळणार नसून फक्त प्रीपेड अकाउंटची वैधता वाढेल. एअरटेलच्या २३ रुपयांच्या रिचार्जची वैधता २८ दिवस आहे, तर व्होडाफोन-आयडियाचा २४ रुपयांच्या प्लॅनची वैधता १४ दिवसांची आहे.

एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया या कंपन्यांना आपल्या ARPU म्हणजेच अ‍ॅव्हरेज रेव्हेन्यू पर युजरमध्ये खूप नुकसान होत होते. या नुकसान भरपाईसाठी मिनीमम रिचार्ज पॉलिसी लागू करण्यात आली. दोन्ही कंपन्यांनी ऑक्टोबर 2018 पासून मिनिमम रिचार्ज पॉलिसी लागू केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/