मंदीरे खुली करण्यासाठी, जावलीत भाजपच्या वतीने करहर येथे रास्तारोको

कुडाळ : पोलीसनामा ऑनलाइन  –   महाविकास आघाडी सरकार च्या धोरणांचा निषेध करण्यासाठी जावली भाजपाच्या वतीने करहर ता.जावली येथील एस.टी.स्टँड समोर श्री विठ्ठल मंदीराशेजारी भाजपा जावली तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

घोषणा देण्यात आल्या. मंदीरे चालू झालीच पाहिजेत. नवरात्री उत्सवाला परवानगी मिळालीच पाहिजे. अशा घोषणा देऊन ज्याप्रमाणे दुकाने, बाजारपेठ चालू आहे, इतकेच काय पण बार, दारूची दुकानेही चालू आहेत परंतु हिंदू धर्मियांची श्रद्धास्थाने असलेली गावोगावची मंदीरे बंद असल्याने भाविक, धार्मिक पुजा अर्चा, अभिषेक, आरत्या बंद असल्यामुळे लोकांच्या मनभावना दुखावल्या असून त्याचा उद्रेक होण्यापूर्वीच शासनाने मंदीरे खुली करावी. सोशल डिस्टंस पाळून व कोविड -19 चे सर्व नियम पाळून गावोगावी येणाऱ्या नवरात्री पर्वास घटस्थापनेस परवानगी मिळावीअशी मागणी करण्यात आली. यावेळी भाजपा सहकार आघाडीचे संयोजक अविनाश पवार, क्रिडा आघाडीचे पैलवान वसंतराव मानकुमरे बुथप्रमुख सनपाने शिवाजी पवार, दिलीप यादव, मनिष गोळे, गुलाबराव रांजणे , राजूशेठ गोळे आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते. यानंतर सहाय्यक पोलिस फौजदार शिंदे यांना निवेदन देण्यात आले.