लव्ह जिहाद रोखण्यासाठी कुंकू लावावे : विहिंपच्या पत्रकातून महिलांना सूचना

दुर्गापूर : वृत्तसंस्था

कुंकू लावा, मंगळसूत्र घाला, हिंदू सण साजरे करा, धार्मिक वातावरण निर्माण करा, आंतरधर्मीय विवाह केल्यास पतीला हिंदू धर्म स्वीकारायला लावा, मदतीसाठी आमच्याशी संपर्क साधा, असे पत्रक विश्व हिंदू परिषदेने तयार केले आहे. पश्चिम बंगालमध्ये विहिंपने लव्ह जिहादविरोधात मोहिम सुरू केली असून या पत्रकांचे वाटप आता घरोघरी करण्यात येणार आहे.

[amazon_link asins=’B0756Z53JN,B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’50aae3cc-b0c6-11e8-b3fa-ed4b90ebd01f’]

विश्व हिंदू परिषदेशी संलग्न संघटना दुर्गा वाहिनी आणि बजरंग दल यांनी पश्चिम बंगालमध्ये लव्ह जिहादविरोधात मोहिम उघडली आहे. या मोहिमेंतर्गत घरोघरी जाऊन जनजागृती करण्यात येणार आहे. बिहार आणि ओडिसा येथील विश्व हिंदू परिषदेचे सचिव सच्चिंद्रनाथ सिन्हा हे या मोहिमेसंदर्भात माहिती देताना म्हणाले की, लव्ह जिहादचे भीषण वास्तव जनतेसमोर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. लव्ह जिहाद रोखण्यासाठी आम्ही पालकांना काही सूचना दिल्या आहेत. या सूचनांची पत्रके तयार करुन ती घरोघरी वाटली जातील. तसेच ज्या पालकांच्या मुली लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकल्या त्या पालकांचे समुपदेशन करुन त्यांना कायदेशीर मदत उपलब्ध करुन दिली जाईल. लव्ह जिहादचा प्रकार कसा ओळखावा, त्यापासून मुलींचे रक्षण कसे करावे, मुलगी त्या जाळ्यात अडकली तर काय करावे, याची माहितीही या पत्रकांमध्ये आहे.

आमचा प्रेमविवाहाला विरोध नाही. आमचा विरोध हिंदू मुलींना लक्ष्य करण्यासाठी सुरु केलेल्या लव्ह जिहादला आहे. आम्ही लव्ह जिहादमध्ये अडकलेल्या मुलींच्या पालकांची एक यादी तयार केली आहे. आम्ही त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत. मुलीच्या घरवापसीसाठी आम्ही त्यांना मदत करु. दुर्गा वाहिनीचे ३५ हजार आणि बजरंग दलाचे ४० हजार सदस्य या मोहीमेत सहभागी होणार आहेत, अशी माहिती पश्चिम बंगालमधील विहिंपचे प्रवक्ते सौरीश मुखर्जी यांनी दिली.

उद्या पुणे-मुबंई द्रुतगती मार्ग ४० मिनिटांसाठी बंद असणार