कारागृहात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्यातील २४ जिल्ह्यात उभारली ३० तात्पुरती कारागृह

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   कारागृहात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्यात २४ जिल्ह्यात ३० तात्पुरती कारागृह उभारली आहेत. या कारागृहामध्ये आतापर्यंत १ हजार ३६० कैदी ठेवण्यात आले आहेत. पुणे आणि रायगड येथे सर्वाधिक कैदी ठेवण्यात आले आहेत.

राज्यात काही कारागृहात कैद्यांना कोरोनाची लागण झाली. नवीन कैद्यांमुळे कारागृहातल्या कैद्यांना संसर्ग होण्याची शक्यता गृहित धरून तात्पुरती कारागृहे उभारण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. कारागृहाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक सुनील रामानंद यांनी तात्पुरती कारागृह उभी करून जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यास सांगितले होते. त्यानुसार आतापर्यंत २४ जिल्ह्यात ३० तात्पुरती कारागृह तयार केली आहेत. १ हजार ३६० कैदी ठेवण्यात आले असून यात १ हजार ३०० कैदी पुरूष आहेत. तर ६० महिला कैदी आहेत.

पुणे जिल्ह्यासाठी ३ तात्पुरती कारगृह उभारली आहेत. त्यानंतर रायगड व वाशीम या जिल्ह्यात २ तात्पुरती कारागृत तयार केली आहेत. तर, बाकी ११ जिल्ह्याच्या ठिकाणी तात्पुरती कारागृह उभारण्याच्या कामास सुरूवात करण्यात आली आहे. शासकीय इमारती अथवा खासगी ठिकाणी ही तात्पुरती कारागृह उभारली जात आहेत.

—चौकट—

९ हजार कैद्यांना सोडले

कोरोनाचा पार्श्वभुमीवर न्यायालयाने ७ वर्षापेक्षा कमी शिक्षा असलेल्या कैद्यांना तात्पुरता जामिनावर सोडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ५ हजार १०५ कैदी सोडले आहे. तर, शासनाने ५० टक्के कैदी सोडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आतापर्यंत १ हजार ९७५ कैद्यांना सोडले आहे. कैदी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर, पॅरोलवर २ हजार २७४ कैद्यांना सोडण्यात आले आहे. आतापर्यंत कारागृहातून ९ हजार ३५४ कैद्यांना सोडले असून सध्या २८ हजार २३८ कैदी कारागृहात आहेत. कैदी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे.

———————

तात्पुरती कारागृह- ३०

तात्पुरत्या कारागृहातील कैदी- १३६०

आतापर्यंत सोडलेले एकूण कैदी- ९३५४

पॅरोलवर सोडलेले कैदी – २२७४

सध्या कारागृहात असलेले कैदी- २८२३८

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like