डाॅल्बी विरोधात अधीक्षकासह सातारा पोलीस रस्त्यावर

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन

उच्च न्यायालयाने डाॅल्बीचा निर्णय राखुन ठेवला आहे. तर साताऱ्यात डाॅल्बी वाजणारच अशी भूमिका खासदार उदयनराजे यांनी घेतली आहे. त्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर सातार पोलीसांनी डाॅल्बी विरोधात रॅली काढली.
[amazon_link asins=’B078124279,B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’639139d9-bcbe-11e8-b286-471b8f214940′]

सातारा पोलीसांनी शाळकरी विध्यार्थ्यांना डाॅल्बीविरोधातल्या भूमिकेत मोठ्या प्रमाणात सहभागी करुन घेतले होते. विध्यार्थ्यांच्या हातात डाॅल्बी विरोधी फलक देण्यात आले. विशेष म्हणजे, सातारा जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख स्वत: रॅलीत सहभागी झाले होते.  डाॅल्बी विरोधात पोलीस रस्त्यावर उतरण्याचे राज्यातील हे पहिलेच उदाहरण आहे.

कोर्टाच्या आदेशानंतरही साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी कुठल्याही परिस्थितीत डाॅल्बी वाजणारच अशी भूमिका घेतली आहे. कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम उभा राहणार असे उदयनराजे म्हणाले आहेत. उदयनराजे यांच्या आव्हानाला सातारा पोलीसांचे रॅलीच्या माध्यमातून हे वेगळे आव्हान आहे. त्यामळे उदयनराजे नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा.

पोलीसनामाला ट्विटरवर फाॅलो कर.

पोलीसनामाचे युट्यूब चॅनेलला सब्सक्राईब करा.

पोलीसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जाॅईन व्हा.