संजय राऊतांच्या निषेधार्ध उद्या सांगली ‘बंद’ची हाक, पदावरून हटवण्याची मागणी

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानाच्या वतीनं उद्या(दि 17 जानेवारी) सांगली बंदचं आव्हन करण्यात आलं आहे. संजय राऊत यांनी शिवाजी महाराजांच्या वंशजांच्या विरोधात वक्तव्य केल्यानं हा बंद पुकारण्यात आला आहे. उद्याच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील सांगलीच्या दौऱ्यावर असणार आहेत. असं असताना उद्याच सांगली बंदची हाक देण्यात आली आहे. संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला जाताना दिसत आहे.

ज्या पद्धतीनं संजय राऊत यांनी उदयनराजेंबद्दल वक्तव्य केलं त्यानंतर शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान या संघटनेनं उद्या सांगली बंदचं आव्हान केलं आहे. शिप्रतिष्ठन ही संघटना नेहमीच उदयनराजेंच्या मागे असते. यावेळीही या संघटनेचा उदयनराजेंना पाठिंबा आहे. संभाजी भिडे यांनी सांगली बंदचं आव्हान केलं आहे. खास बात अशी की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्याच सांगली दौऱ्यावर असणार आहेत.

संजय राऊतांच्या विधानाचा निषेध करताना संभाजी भिडे म्हणाले, “संजय राऊत यांचं वक्तव्य अपमानास्पद आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. त्यांनी देशाचाच नाही तर छत्रपतींच्या परंपेरचा अपमान केला आहे. यामुळे उद्या(दि 17 जानेवारी) सांगली जिल्हा बंद असेल. संजय राऊत राज्यसभेचे खासदार आहेत. उदयनराजेंचा अपमान करणाऱ्या आणि निंदनीय वक्तव्य करणाऱ्या संजय राऊतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पदावरून हटवावं. अन्यथा महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातही असाच बंद केला जाईल.” असा इशाराही त्यांनी दिला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like