श्रीक्षेत्र देहु, आळंदी व पंढरपुर या तिर्थ क्षेत्रांच्या विकासासाठी जादा निधी द्यावा : खा. श्रीरंग बारणे 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

श्री क्षेत्र देहु, आळंदी व पंढरपुर या तिर्थ क्षेत्रांच्या ठिकाणी भाविकांच्या सोयीसाठी व तिर्थ क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकारने जास्त निधी द्यावा अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेच्या शुन्य काळात केली.

वारकऱ्यांचे श्रद्धा स्थान असलेल्या पंढरपुरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी विविध ठिकांणाहुन भाविक भक्त दर्शनासाठी येतात. आषाढी व कार्तिक एकादशीला या ठिकांणी मोठी यात्रा भरते. या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यातुन १० ते १५ लाख वारकरी भाविक भक्त येतात. श्री क्षेत्र देहु येथुन श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी व श्री क्षेत्र आळंदी येथुन संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा निघतो तसेच महाराष्ट्र, कर्नाटकामधुन जवळपास २०० च्या वर पालख्या २० ते २५ दिवस पायी चालत येतात. या पालख्या सोबत लाखोच्या संख्येने भाविक भक्त पंढरपुर येथे चालत दर्शनासाठी येत असतात.
[amazon_link asins=’B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’addbb364-9665-11e8-8da6-f3a2d00095a7′][amazon_link asins=’B071HWTHPH’

पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी दि. २९ जुलै रोजी झालेल्या “ मन की बात ” या कार्यक्रमामध्ये पंढरपुरच्या वारीचा आनंद देशातील सर्वांनी घेतला पाहिजे ही एक अदभुत यात्रा आहे. या यात्रे मध्ये एकदा तरी देशातील नागरिकांनी सहभागी व्हावे असे पंतप्रधान म्हणाले. याचा उल्लेख करून बारणे म्हणाले पंढरपुर यात्रे दरम्यान यात्रेकरूंसाठी सुविधांचा मोठा आभाव आहे. या यात्रेकरूंसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छता, शौचालय, व अन्य सुविधा त्यांना मिळत नाही. त्या सुविधा पुरविण्यासाठी मोठ्या आर्थिक निधीची आवश्यक्ता असल्याने श्री क्षेत्र देहु, आळंदी व पंढरपुर या तिर्थ क्षेत्रांच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या वतीने जास्तीत जास्त आर्थिक निधी देण्यात यावा अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेच्या शुन्य काळात केली असे बारणे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे.