नववर्षात वीज चोरांची ‘खैर’ नाही, मोदी सरकारनं बनवला ‘मुसक्या’ आवळण्याचा विशेष प्लॅन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अवघ्या दोन दिवसानंतर नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. मात्र या नवीन वर्षात वीज चोरट्यांचा सुळसुळाट वाढू शकतो. वीज वितरण कंपन्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ऊर्जा मंत्रालयाने २०२० साठी नवीन कार्य योजना तयार केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व राज्यांना ज्या जिल्ह्यांमध्ये जास्तीत जास्त वीज चोरीच्या घटना घडत आहेत त्यांची यादी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. आपल्या क्षेत्रात वीज चोरी झाली असेल तर तेथे ग्राहकांच्या अडचणीत वाढू होऊ शकते. जास्तीत जास्त वीज चोरीच्या घटना ज्या जिल्ह्यात घडतात त्या जिल्ह्यांची यादी तयार करण्यास ऊर्जा मंत्रालयाने राज्यांना सांगितले आहे.

२०२० मध्ये सरकार विशेष मोहीम सुरू करेल. त्याअंतर्गत राज्यात वीज चोरीसह जिल्ह्यांची यादी तयार करण्यास सांगण्यात आले आहे. १५ टक्के पेक्षा जास्त वितरण असलेल्या जिल्ह्यांची यादी तयार असेल.

मिळालेल्या माहितीनुसार जिथे जास्त वीज चोरी केली जाते, तेथे कमी पुरवठा केला जाईल. त्याच वेळी, जिथे वीज चोरी कमी होईल, तिथे  DISCOM  २४ तास वीज उपलब्ध करून देईल. वीज चोरी थांबविल्यास  DISCOM ला कर्ज मिळणार नाही. दरम्यान, वीज चोरीमुळे  DISCOM  प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. तोटा झाल्यामुळे डिस्कॉमवर, कोटी रुपयांचे कर्ज थकबाकी असून, ऊर्जा मंत्रालयाने हे पाऊल उचलले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/