Corona Virus : चीनमध्ये ‘मास्क’ लावून ‘कुत्री-मांजरीं’ना फिरवतायत लोक, फोटो ‘व्हायरल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसमुळे आत्तापर्यंत पूर्ण जगात ६५ हजार लोक संक्रमित झाले आहेत. चीन मध्ये मृत्यू पावलेल्या लोकांचा आकडा १५०० पर्यंत पोहोचला आहे. जगभरातील काही देशांमध्ये देखील या व्हायरसमुळे लोकांचा मृत्यू झाला आहे. आता कोरोना व्हायरसची भीती इतकी वाढली आहे की लोक आपल्या कुत्री – मांजरांना देखील मास्क लावून फिरवायला नेत आहेत.

काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की कोरोना व्हायरस हा प्राण्यांच्या माध्यमातून देखील पसरू शकतो. म्हणूनच लोक त्यांचे संरक्षण करण्यासाठी चीनमधील पाळीव प्राण्यांना मास्क लावत आहेत.

मुखवटा घातलेले कुत्री आणि मांजरींचे फोटोही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. लोक कुठेही फिरायला जात असतील तर आपल्या पाळीव प्राण्यांनाही मास्क घालत आहेत.

काही दिवसांपूर्वी चीनमध्ये कोरोना विषाणूच्या भीतीमुळे लोक इतके घाबरले होते की ते पाळीव प्राण्यांना मारून रस्त्यावर फेकत होते. परंतु लोकांना या बाबतीत जागरूक करण्यात आले त्यानंतर त्यांनी प्राण्यांना मारणे बंद केले.

ट्विटरवर मास्क घातलेले कुत्री आणि मांजरींची बरीच फोटो व्हायरल होत आहेत आणि लोक त्यांचे कौतुक देखील करत आहेत. लोक म्हणतात की कोरोना व्हायरस पसरल्यानंतरही, लोक माणुसकीला विसरले नाहीत आणि मनुष्यांव्यतिरिक्त प्राण्यांना देखील मदत करीत आहेत.

चीनमध्ये आतापर्यंत एक हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. एकूण संक्रमित लोकांपैकी ५९,५३९ लोक हे केवळ चीनमध्ये आहेत. चीनमध्ये बरीच शहरे ओस पडली आहेत. रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत कुठेच लोक दिसत नाहीत.

You might also like