लैंगिक अत्याचारापासून वाचण्यासाठी तिने लढवली शक्कल, सांगितले मी आहे HIV Positive

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – एका विधवेने लैंगिक अत्याचारापासून वाचण्यासाठी एक चांगलीच शक्कल लढवली आहे. तिने केलल्या उपायानंतर लैंगिक अत्याचार करु पाहणारे आरोपी घाबरला आणि त्यामुळे त्या विधवेची इज्जत वाचली. आरोपीचं नाव किशोर विलास अवहद असं आहे. सध्या पोलिसांनी सदर आरोपीला अटक केली होती आणि तो शिक्षा भोगून बाहेर आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ७ वर्षांच्या तिच्या मुलासोबत शहरातील एका दुकानात आली होती. जेव्हा ती घरी निघाली तेव्हा तिच्या लक्षात आले की तिच्याकडे केवल दहा रुपये आहेत. तिने शेअरींग ऑटो पकडण्याचाही प्रयत्न केला परंतु काही फायदा झाला नाही.

त्याचवेळी आरोपी अहमद मोटारसायकलवरून चालला होता. त्याने सदर महिला आणि तिच्या मुलीला लिफ्ट दिली. परंतु त्यांने त्या महिलेला तिच्या घरी न नेता सुनसान ठिकाणी घेऊन गेला. त्याने धारदार शस्त्र दाखवत महिलेला घाबरवण्याचाही प्रयत्न केला. महिलेने प्रसंगावधान राखत त्याच्यापासून वाचण्यासाठी एक चांगली शक्कल लढवली. ती एचआयव्ही पॉझिटीव्ह असल्याचे तिने सांगितले. त्यानंतर आरोपी अवहदने तिला सोडून दिले आणि तो तेथून निघून गेला. तिच्या हजरजबाबीपणामुळे तिची इज्जत वाचली.