फक्त 3 रूपये खर्च करून तुमच्या बँक ‘अकाऊंट’ला ऑनलाइन ‘फ्रॉड’पासून ‘सेफ’ ठेवा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिवसेंदिवस देशातील तंत्रज्ञान सुधारत चाललेले आहे आणि त्यामुळे सायबर सिक्युरिटीचीही खूप मोठ्या प्रमाणावर गरज भासत आहे. जर तुम्हाला तुमच्या पैशांना सुरक्षित करायचे असेल तर तुम्ही देखील ही पॉलिसी घेऊ शकता. एचडीएफसी अर्गो ( irgo ) ने एक सायबर इन्शोरन्स पॉलिसी लॉंच केली आहे. यामध्ये 50 हजारांचा विमा केवळ तीन रुपयात दिला जाणार आहे.

यापासून सुरक्षा करणार पॉलिसी
ही योजना अनेक प्रकारच्या सायबर रिस्क पासून सुरक्षा देते. यामध्ये नकली ऑनलाइन ट्रॅन्जेक्शन, फिशिंग आणि ईमेल स्पूफिंग, ई-एक्सटॉर्शन, ओळख लपवून केलेली चोरी (आइडेंटिटी थेफ्ट) आणि साइबर बुलिंग यांचा समावेश आहे. एचडीएफसी अर्गो या सायबर विमा पॉलिसीमध्ये सामान्य लोक आणि त्यांच्या कुटुंबियांना सायबर फसवणूक, डिजिटल धमकी किंवा सायबर हल्ल्यामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानापासून संरक्षण करते.

ऑनलाइन व्यवहारासाठी भारत जगभरातील देशांपैकी दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. त्यामुळे येथे सायबर इंश्योरन्स हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर विस्तारला जाऊ शकतो. सध्या सायबर गुन्ह्यांमध्ये जोरदार वाढ होत आहे त्यामुळे अशा योजनांची गरज भासणार आहे.

काय मिळणार नेमकं ग्राहकांना
या योजनेमध्ये ऑनलाइन फसवणूकी बाबतचे सगळे गुन्हे कव्हर होतात. संपूर्ण कुटुंबाच्या सुरक्षेसाठी ही पॉलिसी घेता येते. मुळात या पोलीमध्ये पती पत्नी आणि दोन मुले कव्हर होतात. यामध्ये सगळ्या प्रकारची उपकरणे आणि ठिकाणांचा समावेश आहे. यामध्ये सायबर फसवणूक झालेल्यांसाठी न्यायालयीन सल्ला देण्याची देखील तरतूद करण्यात आलेली आहे.

नॅशनल क्राइम रिकॉर्ड ब्यूरो (NCRB) च्या अहवालानुसार 2016 मध्ये सायबर क्राईमच्या घटनेमध्ये 6.3 %वाढ झाली आहे. 2015 मध्ये देशात 11,592 इतके सायबर गुन्हे नोंदवल्यात आले होते. 2016 मध्ये यात वाढ होऊन ही आकडेवारी 12,317 वर पोहचली होती.

Visit : Policenama.com