गो-रक्षणासाठी बेदम मारहाणीचे सत्र पुन्हा सुरु

भोपाळ : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून एक दिवस होत नाही तोच देशात पुन्हा गो -रक्षणासाठी मारहाणीचे सत्र पुन्हा सुरु झाल्याचे उघडकीस आले आहे. गोमांस बाळगल्याच्या संशयावरून तीन जणांना गोरक्षकांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.याप्रकरणी पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे.

अटक करण्यात आलेले गोरक्षक राम सेना या संघटनेचे कार्यकर्ते असल्याचे पोलिसांनी सांगितले. शुक्रवारी संध्याकाळी या पाच जणांनी मध्य प्रदेशमधील सेवनी गावात एका महिलेसह तिघांना हटकले.

त्यांच्याकडे गोमांस असल्याच्या संशयावरून गोरक्षकांनी त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली आणि त्या प्रकारचा व्हीडिओही काढला. हा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.