Coronavirus : सोलापूर जिल्ह्यात ‘कोरोना’चा कहर, जाणून घ्या आकडेवारी

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना संसर्गाने हाहाकार माजवला आहे. शनिवारी (दि ११) सर्वाधिक १०७ रुग्णांची भर पडली आहे. आतापर्यंत एकूण ८१७ जणांना याची लागण झाली आहे. तर ३२ जणांचा मृत्यू या संसर्गाने झाला आहे. सर्वाधिक २२ रुग्ण वैराग येथे सापडले आहेत. तर शनिवारी तिऱ्हे येथील ४७ वर्षीय महिला आणि आणि बार्शीतील जयशंकर मिल परिसरातील ५५ वर्षीय पुरुषाचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील ‘या’ भागात सापडले नवे रुग्ण

उत्तर सोलापुरातील कारंबा, तिऱ्हे येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. मोहोळमधील आदर्श चौक, दत्त नगर येथे प्रत्येकी एक, खवणी दोन, सोहाळे, मसले चौधरी, देवडी येथे प्रत्येकी एका रुग्णांची भर पडली आहे. माळशिरस तालुक्‍यातील कोंडबावी, अकलूज येथे प्रत्येकी एक तर गुरसाळे येथे दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. माढ्यातील रिधोरे, मोडनिंब येथे प्रत्येकी दोन, भोसरे येथे तीन, चिंचगाव येथे एक रुग्ण कोरोनाबाधित सापडला आहे. तर दक्षिण सोलापुरातील कासेगाव, तांदुळवाडी, बरुर, कुंभारी, मुळेगाव तांडा, मंद्रूप येथे प्रत्येकी एक, कंदलगावात दोन, बोरामणीत पाच, भंडारकवठ्यात तीन रुग्णांची भर पडली आहे. पंढरपुरातील रजपूत गल्लीत एक आणि अक्‍कलकोटमधील खोडवे गल्ली, आझाद गल्ली, फत्तेसिंह चौक, मोरे वस्ती, करजगी, सलगर येथे प्रत्येकी एक रुग्ण, संजय नगरात दोन, भारत गल्लीत तीन, पुकाळे प्लॉट चार, नागणहळ्ळी चार रुग्ण आढळले आहेत. बार्शीतील भोसले चौक, मांगाडे चाळ, देसाई प्लॉट, फुले प्लॉट, भवानी पेठ, मनगिरे मळा, उपळाई ठोंगे, भालगाव, नागोबाची वाडी, गाताची वाडी, वाणेवाडी, साकत पिंपरी येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. बारंगुळे प्लॉट, जयशंकर मिलसमोर, व्हनकळस प्लॉट येथे प्रत्येकी दोन रुग्णांची भर पडली आहे. कसबा पेठेत चार, सुभाष नगरात तीन, वैराग 22, पिंपळगाव ढाळे तीन असे एकूण 107 रुग्णांची भर पडली.

तालुकानिहाय कोरोना संसर्गित रुग्ण

अक्कलकोट – १५४
बार्शी – १७१
करमाळा – ६
माढा – २६
माळशिरस – ११
मंगळवेढा – ३
उत्तर सोलापूर- ८८
पंढरपूर – ४१
सांगोला – ५
दक्षिण सोलापूर – २६८
एकूण – ८१७

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like