13 मार्च राशीफळ : काय सांगतात तुमचे ‘ग्रह-तारे’, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम : मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. वैवाहिक जीवनात आनंद वाढेल आणि जोडीदारावरील प्रेम वाढेल. कामात चांगले परिणाम मिळतील. कारण तुम्ही मेहनत आणखी वाढवाल. पण आरोग्यावरही लक्ष ठेवा. प्रेम जीवनासाठी दिवस सामान्य आहे. धार्मिक कार्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आदर आणि सन्मान मिळेल. तुमचा खास मित्र तुम्हाला मदत करेल.

वृषभ
आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा कमजोर आहे. खर्च अचानक वाढेल. आनंदासाठी तुम्ही काही अनावश्यक खर्च कराल, ज्यामुळे नंतर पश्चात्ताप करावा लागेल. विरोधक आणि शत्रूपासून सावध रहा, त्यांचा विजय होऊ शकतो. आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास आजारी पडू शकता. वैवाहिक जीवनात तणाव राहू शकतो. प्रेमसंधात चांगले परिणाम मिळतील. कामात प्रयत्न केल्यास यश मिळेल.

मिथुन
आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे. प्रेमसंबंधात यशस्वी होऊ शकता. प्रिय व्यक्तीशी जवळीक वाढेल. विवाहितांसाठी आजचा दिवस चांगला असेल. व्यवसायाच्या बाबतीत आजचा दिवस खूप खास आहे. तुमच्या योजना तुम्हाला चांगला फायदा देतील. आरोग्यही चांगले राहील. आपण नोकरीवर असाल तर, वढतीचे योग आहेत, प्रयत्न सुरू ठेवा.

कर्क
आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे. कुटुंबाकडे संपूर्ण लक्ष राहिल. कुटुंबासोबत वेळ घालवाल आणि घरगुती खर्च कराल. कामासाठी दिवस चांगला आहे. जे तुमच्याबरोबर काम करतात त्यांना तुम्ही सहकार्य कराल. कामात गती दाखवाल. यामुळे कौतूक होईल. आरोग्यही चांगले राहिल. खर्चावर अंकुश ठेवणे खूप महत्वाचे आहे. प्रेमसंबंधात दिवस सामान्य आहे. विवाहितांना आनंदाचे क्षण लाभतील. दिलेले पैसे परत मिळू शकतात.

सिंह
आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य आहे. प्रवासासाठी चांगला दिवस आहे. कुटुंबातील सर्वात लहान व्यक्तीचे सहकार्य मिळेल. त्यांच्यावरील प्रेम वाढेल. भाग्यामुळे रखडलेली कामे पूर्ण होतील. नोकरीत प्रगती होईल. व्यवसायात देखील चांगले परिणाम मिळतील. प्रेमसंबंधासाठी दिवस थोडा कमजोर आहे. प्रिय व्यक्तीसोबत भांडण टाळा. विरोधकांना तोंड द्याल. आरोग्य कमजोर राहिल. विवाहिताना चांगले परिणाम मिळतील.

कन्या
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. कौटुंबिक वातावरण काही खास गोष्टीसह पुढे जाईल. ज्यामध्ये तुमचा हस्तक्षेप देखील आवश्यक असेल. चांगल्या खाण्या-पिण्याकडे लक्ष द्याल. सुखसुविधांचा आनंद घ्याल. प्रेमसंबंधांसाठी दिवस कमजोर आहे. विवाहितांसाठी दिवस चांगला आहे. नोकरीत तीक्ष्ण बुद्धीचा वापर केल्याने प्रशंसा होईल.

तुळ
आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे. मन प्रसन्न राहिल. प्रत्येक काम चांगल्या पद्धतीने कराल. व्यवसायात चांगले परिणाम दिसून येतील. जोडीदाराशी संबंध सुधारतील आणि वैवाहिक जीवनात रोमान्स वाढेल. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. प्रिय व्यक्तीला आपल्या कुटुंबाबद्दल सांगाल. कामात चांगले परिणाम मिळतील. जास्त मेहनत करावी लागेल. घराबाहेर जास्तीत जास्त वेळ घालवाल.

वृश्चिक
आजचा दिवस सावधगिरीचा बाळगण्याचा आहे. कारण तुमचा खर्च वाढेल. मानसिक चिंता देखील वाढतील. काही विरोधक अधिक सक्रिय होऊ शकतात, जे आपणास हानी पोहोचविण्याचा प्रयत्न करतील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. विवाहितांसाठी दिवस चांगला आहे, परंतु जोडीदार खूप खर्च करेल, ज्याचा भार तुमच्या खिशात येईल. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे.

धनु
आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे. धनलाभ होईल. उत्पन्न वाढल्यामुळे आनंदी व्हाल. प्रेमसंबंधासाठी दिवस खास आहे. रोमान्सची संधी मिळेल. वैवाहिक जीवनात चढ-उतार राहिल. आरोग्य ठिक राहिल. थकवा जाणवेल. कामात चांगले परिणाम मिळतील.

मकर
आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य आहे. वाढलेला खर्च डोकेदुखी ठरेल. यासाठी सावधगिरी बाळगा. लक्ष कामावर केंद्रित करा. कुटुंबाला देखील वेळ द्याल. कुटुंबासाठी एखादी शुभवार्ता येऊ शकते. प्रेमसंबंधासाठी चांगला दिवस आहे. विवाहितांचे जीवन थोडे गोंधळलेले असू शकते. आरोग्य चांगले राहील.

कुंभ
आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य आहे. पाणथळ ठिकाणी फिरण्यासाठी जाऊ शकता. प्रवासाने मन हलके होईल. ताजेपणा जाणवेल. कुटुंबातील छोट्यांचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनासाठी दिवस चांगला आहे. जोडीदार तुम्हाला महत्त्व देईल. प्रेमसंबंधासाठी दिवस कमजोर आहे. काळजी घ्या. वाईट काहीही बोलू नका. खर्च अधिक होईल. आरोग्य कमजोर राहिल. कामात चांगले परिणाम मिळतील आणि उत्पन्न वाढेल.

मीन
आजच्या दिवशी थोडे सावध राहा. कारण तुमची तब्येत बिघडू शकते. तुम्ही आजारी पडू शकता. अचानक धनहानी होऊ शकते. आजच्या दिवशी पैसे गुंतवू नका. उत्पन्न वाढविण्यावर भर द्या. वैवाहिक जीवनात संमिश्र अनुभव येतील. प्रेमसंबंधासाठी कमजोर आहे. कामात खूप मेहनत कराल. काही नवीन प्रयोग कराल. बुद्धिमत्तेचा फायदा होईल.