15 मार्च राशीफळ : मकर

पोलीसनामा ऑनलाईन टीम : मकर
आजचा दिवस संमिश्र परिणामांचा आहे. तुमच्या काही इच्छा पूर्ण होतील. खर्चात वाढ होईल. कामात व्यस्तदेखील रहाल. चिंता देखील सतावतील. विरोधकांना घाबरण्याचे कारण नाही. तुमचे आरोग्य चांगले राहिल आणि कुटुंबाचे वातावरणही आनंद देईल. प्रेमसंबंधात चांगले परिणाम मिळतील आणि तुमची प्रिय व्यक्ती तुम्हाला भेट देऊ शकते. दाम्पत्य जीवनासाठी दिवस चांगला आहे. जोडीदार आनंद देईल. कामात मेहनतीचे चांगले परिणाम मिळतील.