16 मार्च राशीफळ : जाणून घ्या कसा असेल आठवड्याचा पहिला दिवस, कोणत्या राशींचे ‘नशीब’ उजळणार

पोलीसनामा ऑनलाईन टीम : मेष – आजचा दिवस खुप चांगला आहे. आरोग्यात सुधारणा होईल. ताजेतवाने झाल्याने आनंदीत राहाल. आज प्रवासात यश मिळेल. काही लोक तिर्थयात्रेला जातील. यामुळे मनाला शांती लाभेल. ज्येष्ठांचे आरोग्य सुधारेल. कामात बदलीचे योग आहेत. उत्पन्न ठिक राहिल. वैवाहिक जीवनात यश मिळेल. कुटुंबात शांतता कायम राहिल.

वृषभ
आजचा दिवस कमजोर आहे. खाण्या-पिण्याकडे लक्ष द्या. वैवाहिक जीवनात तणाव वाढेल, ज्याचा परिणाम आरोग्यावर होईल. मानसिकदृष्ट्या तणावात राहाल. कामात स्थिती चांगली राहिल. प्रवासाठी दिवस चांगला नाही. उत्पन्न सामान्य राहिल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. मान सन्मान वाढेल. घरच्या लोकांच्या सहकार्याने एखादे नवे काम कराल. व्यापारात अडचणी येऊ शकतात. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे.

मिथुन
आजचा दिवस ठिक आहे. व्यापारात चांगला लाभ होईल. वैवाहिक जीवनात आजचा दिवस चांगला जाईल. जोडीदार तुम्हाला कामातही मदत करेल. नोकरीत चांगले परिणाम दिसून येतील. प्रेमसंबंधात दिवस योग्य आहे आणि तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीला तुमच्या मनातील गोष्ट समजवण्यात यश येईल. कुटुंबात काही अडचणी असू शकतात. यासाठी कुटुंबाचा सन्मान राखा.

कर्क
तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आरोग्याच्या बाबतीत सावधान राहा. तुमचे खर्च खुप वाढतील. आर्थिक स्थितीवर भार पडेल. वैवाहिक जीवनासाठी दिवस थोडा कमजोर आहे. जोडीदार एखाद्या गोष्टीवरून राग व्यक्त करू शकतो. प्रेमसंबंधासाठी दिवस खुप चांगला आहे. नोकरी करणार्‍यांसाठी दिवस कमजोर आहे.

सिंह
आजचा दिवस खुप चांगला आहे. तुमचे उत्पन्न वाढेल. एखादा चांगला मार्ग सापडेल. मित्र आणि प्रियजनांचे सहकार्य लाभेल. कुटुंबात प्रॉपर्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे. यापासून वाचण्याचा प्रयत्न करा. वैवाहिक जीवनासाठी आजचा दिवस आनंदाचा आहे. प्रेम वाढेल. विरोधकांवर मात कराल. नोकरीत चांगले योग येतील.

कन्या
आजचा दिवस ठिक आहे. अडचणी कमी होतील. कामाकडे लक्ष द्या. अन्यथा नकारात्मक प्रभाव दुसर्‍यांवर पडू शकतो. कुटुंबातील मोठ्यांचा मान राखा. त्यांच्यासोबत बसून बोला. घरातील स्थिती समजून घ्या, कौटुंबिक मुद्यांकडे लक्ष द्या. कोणत्याही प्रवासासाठी दिवस अनुकूल नाही. प्रेमसबंधात चांगले परिणाम मिळतील. एखाद्या कर्जातून मुक्ती मिळेल.

तूळ
आजचा दिवस खुप चांगला आहे. चांगले परिणाम दिसून येतील. नवे मित्र मिळतील. कुटुंबातील वातावरण चांगले राहील. कुटुंबातील लोकांच्या वागण्यामुळे आनंदीत राहाल. निरोगी राहण्यासाठी स्वताकडे लक्ष द्या. मानसिकदृष्ट्या मजबूत राहाल. प्रेमसंबंधात चांगले परिणाम दिसून येतील. वैवाहिक जीवनात काही अडचणी येऊ शकतात. कामात सहकार्‍यांशी चांगले वागणे आवश्यक आहे.

वृश्चिक
दिवस ठिक आहे. कुटुंबातील लोकांच्या वागण्यामुळे चिंता वाटेल. कामात चांगले परिणाम दिसून येतील. सोबत काम करणार्‍यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. आरोग्य चांगले राहिल. तुम्ही प्रत्येक काम योग्य पद्धतीने पूर्ण कराल. पैशांच्या बाबतीत दिवस चांगला आहे. प्रेमसंबंधासाठी दिवस सामान्य आहे. वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात.

धनु
तुमच्यासाठी दिवस चांगला आहे. तुमचे उत्पन्न वाढेल. आज एखाद्या खास व्यक्तीची भेट होईल. वैवाहिक जीवनातील तणाव कमी होईल. प्रेमसंबंधात संमिश्र अनुभव येतील. आरोग्य मजबूत राहिल. कामात चांगले परिणाम मिळतील.

मकर
आजचा दिवस चांगला आहे. उत्पन्न वाढविण्याची संधी लाभेल. एखाद्या खास व्यक्तीशी भेट होईल. जुने मित्र भेटतील. घरातील व्यक्तींकडून चांगले सहकार्य मिळाल्याने मन आनंदी राहील. कुणाशीही विनाकारण वाद घालू नका. वेळ वाया घालवल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधात संमिश्र अनुभव येतील. कामात चांगले परिणाम दिसून येतील.

कुंभ
आजचा दिवस खुप चांगला आहे. परंतु पैशांच्या बाबतीत थोडे सतर्क राहा. कामात स्थिती तुमच्या बाजूने राहिल. प्रेमसंबंधात तणावाचा सामना करावा लागू शकतो. विवाहितांच्या जीवनात प्रेम वाढेल आणि जोडीदाराशी एखाद्या गोष्टीवर चर्चा कराल. कामात मेहनतीचे चांगले फळ मिळेल.

मीन
आजचा दिवस खुप चांगला आहे. कुटुंबातील वातावरण चांगले राहिल. तुम्ही तुमचा वेळ कुटुंबासाठी द्याल आणि घरच्यांना तुमच्याबाबत अभिमान वाटेल. प्रेमसंबंधात चांगले परिणाम मिळतील. प्रिय व्यक्तीला खुश ठेवाल. वैवाहिक जीवनासाठी दिवस अनुकूल आहे. कामात चांगले परिणाम दिसून येतील.