18 मार्च राशीफळ : जाणून घ्या बुधवारी कुणाला लाभणार ग्रह-तार्‍यांची साथ

पोलीसनामा ऑनलाईन टीम : मेष – तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. भाग्य मजबूत राहिल्याने कामे होतील. दुपारनंतर स्थितीत आणखी बदल होईल, ज्यामुळे तुमचा फायदा होईल. तुम्ही तुमच्या कामाकडे लक्ष द्याल. मेहनतीचे चांगले फळ मिळेल. व्यापारात चांगले परिणाम मिळतील. मनात इतरांसाठी प्रेमभावना निर्माण होईल. वैवाहिक जीवनात आनंदी राहाल. प्रेमसंबंधासाठी चांगला काळ आहे.

वृषभ
तुमच्यासाठी आजचा दिवस चढ-उताराचा आहे. दुपारपर्यंत स्थिती थोडी खराब राहिल. मानसिक चिंतांपासून मुक्ती दुपारनंतर मिळेल. त्यांनतर धनलाभ होईल. एखादा प्रवास केला तर मनशांती लाभेल. भाग्याची साथ लाभेल. वैवाहिक जीवनासाठी दिवस कमजोर आहे. जोडीदाराशी भांडण होण्याची शक्यता आहे. यासाठी सावध राहा. प्रेमसंबंधासाठी दिवस कमजोर आहे. चुकीच्या खाण्यामुळे आजारी पडू शकता. नोकरीसाठी दिवस चांगला आहे.

मिथुन
आजचा दिवस संमिश्र आहे. दुपारपर्यंत स्थिती खुप चांगली राहिल. तुमच्या बाजूने स्थिती राहिल. व्यापारात फायदा होईल. परंतु, दुपारनंतर एखादी मानसिक चिंता त्रस्त करू शकते. दुपारनंतर एखाद्या खास कामात पैसे गुंतवल्याने नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्य कमजोर राहिल. कामात अडचणी आल्याने चिंता वाढेल. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. प्रिय व्यक्ती तुम्हाला आनंद देईल. वैवाहिक जीवनात तणाव कायम राहिल.

कर्क
दिवसाच्या सुरूवातीला अडचणी येतील. मानसिक चिंता राहिल, परंतु दुपारनंतर स्थितीत बदल होईल. तुमची स्थिती चांगली होईल. व्यापारात चांगला लाभ होईल. जोडीदाराशी संबंध चांगले होतील. कामात प्रयत्नांना यश येईल. कुटुंबाचे वातावरण चांगले राहिल. सर्व एकमेकांवर प्रेम करतील. प्रेमसंबंधात तणावाची स्थिती राहिल. वैवाहिक जीवनात समाधान लाभेल.

सिंह
तुमच्यासाठी आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा आहे. संततीबाबत चिंता वाढतील, सायंकाळी त्या कमी होतील. एखादे यश मिळाल्याने मन आनंदीत होईल. वैवाहिक जीवनात सुख वाढेल. जोडीदार आपल्याबद्दल काही सांगेल त्यावर तुम्ही विचार कराल. व्यापारात फायदा होईल. खर्च वाढतील. आरोग्य कमजोर राहिल. भाग्य मजबूत असल्याने उत्पन्न वाढेल. कामात आजचा दिवस तुमचा आहे.

कन्या
आजचा दिवस खुप चांगला आहे. कुटुंब आणि संततीकडे पूर्ण लक्ष द्याल. दुपारनंतर आपल्या व्यक्तीला खुश ठेवण्याचा प्रयत्न कराल. कुटुंबात थोडे तणावाचे वातावरण राहिल. घरातील ज्येष्ठाची प्रकृती बिघडू शकते. वैवाहिक जीवनात वादाची शक्यता आहे. कामासाठी दिवस खुप चांगला आहे. मेहनतीला यश येईल. तुमची मेहनत यशस्वी होईल. वेगळ्या पद्धतीने धनलाभ होईल.

तूळ
तुमच्यासाठी आजचा दिवस खुप चांगला आहे. कुटुंबाकडे लक्ष द्याल, खर्चही कराल. कामात चांगले परिणाम दिसून येतील. वैवाहिक जीवनासाठी दिवस उत्तम आहे. जोडीदारासोबत रोमान्स करण्याची संधी मिळेल. वैयक्तिक कामांमुळे तुमच्या कामाकडे दुर्लक्ष होईल. कुटुंबातील छोट्यांचे सहकार्य लाभेल.

वृश्चिक
तुमच्यासाठी आजचा दिवस अतिशय चांगला आहे. प्रवासापासून दूर राहाणे आवश्यक आहे, अन्यथा शारीरीक समस्यांसह मानसिक तणाव वाढेल. खर्च जास्त होईल. यामुळे खिशावर ताण येईल. कुटुंबाचे वातावरण चांगले राहिल. चर्चा होईल. वैवाहिक जीवनासाठी दिवस थोडा कमजोर आहे. प्रेमसंबंधात एखाद्या गोष्टीवरून असंतोषाची भावना होऊ शकते. कामात चांगले परिणाम मिळतील. नोकरी बदलण्याच्या दिशेने प्रयत्न कराल.

धनु
तुमच्यासाठी आजचा दिवस खुप चांगला आहे. कुटुंबाचा जास्त विचार कराल. सर्व लक्ष तिकडेच राहिल. उत्पन्न वाढेल. मेहनत कराल. कुटुंबाचे वातावरण तणावपूर्ण राहू शकते. परंतु कामात केलेले प्रयत्न यशस्वी होतील. मेहनतीचे चांगले फळ मिळेल. प्रेमसंबांत रोमान्स करण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवनात तणाव असूनही स्थिती चांगली राहिल. जोडीदार तुमच्या फायद्याचे काम करेल.

मकर
तुमच्यासाठी दिवस थोडा कमजोर आहे. दिवसाची सुरूवात मानसिक तणावाने होईल. परंतु, दिवसासोबत तणावापासून मुक्ती मिळेल. प्रकृती सुधारेल. कुटुंबासाठी खुप चांगला वेळ मिळेल. सर्वजण एकत्र आनंदाने राहतील. एखादे चांगले काम करण्याचा विचार कराल. कामात चांगले परिणाम मिळतील. कुटुंबातील काही लोक फिरण्यासाठी जाऊ शकतात. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. वैवाहिक जीवनासाठी आनंदाचा दिवस आहे. जोडीदार खास मुद्यावर बोलल्याने स्पष्टता वाढेल.

कुंभ
आजचा दिवस चांगला आहे. उत्पन्नात वाढ झाल्याने मन आनंदी होईल. प्रवासात एखादी चांगली व्यक्ती भेटू शकते, जिच्याशी बोलल्याने वेळ कसा गेला समजणार नाही. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. समजूतदारपणो वागा. नाते चांगले राहिल. प्रेमसंबंधासाठी दिवस कमजोर आहे. कामात वातावरण खुप चांगले राहिल.

मीन
आजचा दिवस खुप चांगला आहे. आपल्या कामावर पूर्ण लक्ष द्याल, ज्यामुळे चांगले परिणाम दिसून येतील. सायंकाळपर्यंत उत्पन्नात वाढ सुरू होईल. आनंद वाढेल. प्रेमसंबंधासाठी दिवस थोडा कमजोर आहे. भांडण होऊ शकते, यासाठी सावध राहा. वेळ देण्याचा प्रयत्न कराल. वैवाहिक जीवनात थोडा तणाव राहू शकतो. कुटुंबातील वातावरणामुळे त्रास होऊ शकतो. एखाद्याचे आरोग्य बिघडू शकते.