20 मार्च राशीफळ : आज होतोय शिवयोग, ‘या’ 6 राशींची कामे नक्की होणार, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम : मेष – तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. कामात यश मिळेल आणि नव्या विचाराने आपले काम सुरू कराल, ज्यातून चांगले परिणाम मिळतील. कुटुंबासाठी सुद्धा आजचा दिवस चांगला आहे. आईकडून खुप प्रेम मिळेल, तिचा सल्ला तुमच्या उपयोगी पडेल. आजचा दिवस आनंदाचा असेल. आरोग्य जपा.

वृषभ
आज भाग्याची साथ लाभेल. व्यक्तिगत प्रयत्नांमुळे यश लाभेल. भाग्य उजळेल आणि बाहेर फिरायला जाण्याची संधी मिळेल. मन आनंदीत राहिल. नव्या उर्जेसह आजचा दिवस तुम्ही यशस्वी कराल. प्रेमसंबंधात आजचा दिवस खुप पॉझिटीव्ह असेल. प्रिय व्यक्तीसोबत आनंदाचे क्षण घालवाल. आरोग्यात सुधारणा होईल.

मिथुन
तुमच्या राशीसाठी आजचा दिवस थोडा कमजोर आहे. आरोग्य कमजोर राहील. खर्च जास्त होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात तणाव आणि जोडीदाराचे आरोग्य त्रास देण्याची शक्यता आहे. कामात यश मिळेल आणि विरोधकांवर मात कराल. स्पर्धा परीक्षेसाठी चांगला दिवस आहे.

कर्क
आजचा दिवस खुपच सुरेख आहे. जोडीदाराविषयी प्रेम आणि आकर्षण वाढेल. व्यापारात चांगले परिणाम दिसून येतील. खर्च थोडे वाढतील पण तुम्हाला समाधानही मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदमय राहील. कामासाठी आज दिवस खुप चांगला आहे. मेहनतीला यश नक्की मिळेल.

सिंह
तुमच्यासाठी आजचा दिवस थोडा कमजोर आहे. आरोग्य बिघडलेले राहील. कामामध्ये विलंब होईल. मेहनतीला यश मिळण्यासाठी थोडा वेळ लागेल. प्रेमसंबंधासाठी आजचा दिवस अनुकूल नाही. प्रिय व्यक्तीची समजूत काढण्यात कोणतीही कसर सोडू नका. नोकरीत बदलीचे योग बनत आहेत. प्रॉपर्टीच्या प्रकरणासाठी दिवस अनुकूल आहे.

कन्या
कन्या राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. प्रेमसंबंधात रामँटीक क्षण घालवण्याची संधी मिळेल. शिक्षणात यश मिळेल. संततीला सुख लाभेल. कामात चांगले परिणाम दिसून येतील. केलेल्या मेहनतीला चांगले यश लाभेल. आरोग्यात सुधारणा होईल. कुटुंबातील वातावरण चांगले राहील.

तुळ
तुमच्यासाठी आजचा दिवस खुप चांगला आहे. कुटुंबात चांगला वेळ घालवाल. घरगुती खर्च होईल. कुटुंबासाठी आजचा दिवस खुप चांगला आहे. बहिण-भावाला काही अडचणी असू शकतात. मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहाल. कामासाठी आजचा दिवस अनुकूल आहे.

वृश्चिक
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. एखाद्या प्रवासाला जाण्यासाठी दिवस चांगला आहे. छोटा प्रवास असेल तर मानसिक आनंदही मिळेल तसेच एखाद्या खास व्यक्तीला भेटण्याची संधी सुद्धा मिळेल. खर्च कमी होईल. उत्पन्नात वाढ होईल. यामुळे आत्मविश्वास वाढेल. प्रेमसंबंधात यश मिळेल. कामासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. तुमचे सहकारी सुद्धा तुम्हाला चांगली साथ देतील.

धनु
आजचा दिवस तुमच्यासाठी खुप चांगला आहे. तुमचे बोलणे मधुर राहील. आज एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. चांगले भोजन केल्याने मन तृप्त होईल. आरोग्य थोडे कमजोर राहण्याची शक्यता आहे. खर्च थोडे वाढलेले राहतील. तुम्हाला अचानक एखादी खुशखबर मिळण्याचा योग आहे. ज्यामुळे आजचा दिवस सार्थकी लागू शकतो.

मकर
आजचा दिवस विचारपूर्वक वाटचाल करण्याचा आहे. कारण आज खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. सुख-सुविधांवर खर्च कराल आणि स्वताकडे सुद्धा जास्त लक्ष द्याल. स्वाताला चांगले ठेवण्याचा प्रयत्न कराल. आपले व्यक्तीमत्व बदलण्यासाठी काही कपड्यांची खरेदी करू शकता. तसेच काही ज्वेलरीसुद्धा खरेदी करू शकता. कौटुंबिक जीवन खुप चांगले राहणार आहे. तुम्हाला प्रॉपर्टीमधून लाभ होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधात यश लाभेल. प्रेमाचे क्षण येतील. वैवाहिक जीवनात आज चांगला दिवस आहे. संततीकडून सुख मिळेल.

कुंभ
तुमच्यासाठी आजचा दिवस खुप चांगला आहे. पण आज अनेक आघाड्यांवर तुम्हाला काम करावे लागणार आहे. यापैकी तुमचे आरोग्यही एक आहे. दुसरे आर्थिक आरोग्य. याकडे लक्ष द्यावे लागेल. काही अडचणी आल्याने तणाव जाणवेल. खर्च वाढतील. खर्च तर करावाच लागेल, परंतु आगामी काळात यामुळे त्रास होऊ शकतो. यासाठी खर्चावर नियंत्रण ठेवा. ऑफिसमध्ये तुमचा दबदबा कायम राहील. सर्वजण तुमचे ऐकतील.

मीन
आजचा दिवस तुमच्यासाठी खुप चांगला आहे. भाग्याची पूर्ण साथ लाभेल. प्रयत्न केल्यास प्रगतीची दिशा नक्की सापडणार आहे. उत्पन्न वाढेल. कलेच्या क्षेत्रात मन रमेल. अभिनयाच्या क्षेत्राशी संबंधीत लोकांना फायदा होईल. उत्पन्न वाढेल. प्रेमसंबंधात तुम्ही आजसुद्धा लकी ठराल. वैवाहिक जीवनात जोडीदाराची साथ लाभेल. कौटुंबिक जीवनात शांतता राहील.