24 फेब्रुवारी राशिफळ : मेष

पोलीसनामा ऑनलाईन टीम – मेष : कुटुंबात सुख शांती राहिल. सुग्रास भोजनाचा आनंद घ्याल. गरम मसाले जास्त सेवन केल्यास आरोग्याला त्रास होऊ शकतो. दुखापत होण्याची शक्यता आहे, वाहन काळजीपूर्वक चालवा. प्रवासातून धनप्राप्ती मिळेल. संततीचे सुख आणि सहकार्य लाभेल. विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळतील. दाम्पत्य जीवनात थोडा तणाव राहिल. परंतु, जोडीदाराच्या सहकार्याने मान सन्मान मिळेल.