24 फेब्रुवारी राशीफळ : कोणाला मिळणार भाग्याची ‘साथ’, कोणाच्या मार्गात येणार ‘अडथळे’, वाचा

पोलीसनामा ऑनलाईन टीम – मेष : कुटुंबात सुख शांती राहिल. सुग्रास भोजनाचा आनंद घ्याल. गरम मसाले जास्त सेवन केल्यास आरोग्याला त्रास होऊ शकतो. दुखापत होण्याची शक्यता आहे, वाहन काळजीपूर्वक चालवा. प्रवासातून धनप्राप्ती मिळेल. संततीचे सुख आणि सहकार्य लाभेल. विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळतील. दाम्पत्य जीवनात थोडा तणाव राहिल. परंतु, जोडीदाराच्या सहकार्याने मान सन्मान मिळेल.

वृषभ
एखाद्या प्रवासाला निघू शकता. प्रवास आरामदायक आणि धनप्राप्तीला सहायक ठरेल. भाऊ, बहिण यांच्यासोबत वेळ चांगला जाईल. भाग्य आज तुमची साथ देईल. परंतु, विरोधक आज तुमच्यावर भारी पडतील, यासाठी थोडे लक्ष द्या. तुमच्या सहकार्‍यांचे सहकार्य तुम्हाला कार्यक्षेत्रात सन्मान मिळवून देईल. आज एखाद्या मित्राची भेट होऊ शकते.

मिथून
कार्यक्षेत्रात आजचा दिवस खुप चांगला आहे. तुमच्या बोलणे ऐकले आणि समजून घेतले जाऊ शकते. बढतीचे योग आहेत. कौटुंबिक जीवनात शांतता राहिल आणि आईकडून प्रेम मिळेल. तुम्ही मानसिकदृष्ट्या प्रसन्न रहाल, याचा प्रभाव प्रत्येक क्षेत्रात दिसून येईल. एखादी प्रॉपर्टी घेण्यात यश मिळू शकते.

कर्क
प्रेमसंबंधात आज चांगले अनुभव येतील. उत्पन्नात वाढ होण्याची चांगली शक्यता आहे. तसेच अचानक धनप्राप्तीची शक्यता आहे. एखाद्या कलात्मक कार्यात आवड वाढले, जो तुमचे उत्पन्न वाढविण्याचा मार्ग ठरू शकतो. वडीलांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आरोग्य थोडे कमजोर राहण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे मन आज अभ्यासात लागेल.

सिंह
आज एखाद्या जलस्थळी प्रवास करण्याची संधी मिळू शकते, हा प्रवास सुखद असेल. मान सन्मान वाढेल आणि कार्यक्षेत्रात हलका तणाव राहू शकतो. प्रेमसंबंधात सावध रहा. तिसर्‍या व्यक्तीचा हस्तक्षेप तुमच्या प्रेमसंबंधात अडचणीचा ठरू शकतो. आरोग्याकडे लक्ष द्या. दाम्पत्य जीवन आज चांगले राहिल. जोडीदार तुमचे म्हणणे समजून घेईल.

कन्या
आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा कमजोर असू शकतो. मानसिक तणावात वाढ होऊ शकते आणि खर्च होऊ शकतो. परंतु, कोर्ट-कचेरीच्या कामात विजय मिळेल. विरोधकांवर मात कराल. कार्यक्षेत्रात सफलता मिळेल. दाम्पत्य जीवनात उतार-चढ़ाव होण्याची शक्यता आहे. तुमच्या धाडसाच्या बळावर तुम्ही अनेक आव्हानांमधून मुक्त व्हाल. एखाद्या प्रवासाचा योग आहे.

तुळ
आजचा दिवस दाम्पत्य जीवनात आनंद आणि प्रेम वाढवणारा आहे. आकर्षण वाढेल. प्रेमसंबंधात सोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांचा आजचा दिवस खुप चांगल्या पद्धतीने पार पडेल. एखादा पाहुणा तुमच्या घरी येऊ शकतो. तुम्हाला तुमच्या मित्रमंडळीला भेटण्याची संधी मिळू शकते. कुटुंबातील लोकांचे पूर्ण सहकार्य मिळेल.

वृश्चिक
आज तुमचे मन थोडे बेचैन राहू शकते. मानसिक तणाव वाढू शकतो. कार्यात यश मिळण्याबाबत थोडी आशंका राहू शकते. आरोग्याच्या बाबातीत सावध रहा. छोट्या भाऊ-बहिणीकडून सहकार्य मिळेल. ते तुम्हाला आर्थिकदृष्ट्या मदत करू शकतात. कुटुंबात तणाव राहिल आणि आई-वडिलांचे आरोग्य कमजोर झाल्याने मानसिक चिंता वाढेल. कार्यक्षेत्रात आपल्या सहकार्‍यांवर विश्वास ठेवणे तुमच्यासाठी चांगले राहिल.

धनू
आज तुमचे पूर्ण लक्ष तुमच्या कामावर राहिल. याचा चांगला परिणाम दिसून येईल. प्रॉपर्टीच्याबाबतीत एखादा लाभ होऊ शकतो. कुटुंबातील वातावरण थोडे गरम राहू शकते, परंतु स्थिती नियंत्रणात राहिल. आपल्या विरोधकांपासून सावध रहा. संततीसाठी आजचा दिवस खुप चांगला असेल. प्रेमसंबंधात चांगले क्षण एकत्र घालवण्याची संधी मिळेल. दाम्पत्य जीवनात आनंद मिळेल.

मकर
आजचा दिवस तुमच्यासाठी खुप चांगला आहे. आज तुम्हाला उत्पन्नाचा एखादा नवा मार्ग सापडेल. प्रेमसंबंधात यश मिळेल, पण उतावळेपणा किंवा घाई करू नका. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीचे म्हणणे समजून घ्या. संततीकडून सुख मिळेल. याशिवाय दाम्पत्य जीवनात काही आव्हाने असूनही प्रेम कायम राहिल. कार्यक्षेत्रात बदल करण्याचा प्रयत्न करू शकता. काही लोकांना सध्याची नोकरी सोडून दुसरी नोकरी मिळवण्यात यश मिळेल.

कुंभ
मानसिक तणाव वाढेल. आरोग्य कमजोर राहू शकते. खर्चात वाढ झाल्याने आर्थिकस्थितीवर ताण येऊ शकतो. दाम्पत्य जीवनासाठी दिवस चांगला आहे, परंतु सासरच्या लोकांशी वाद होण्याची शक्यता आहे. विरोधकांना भारी पडाल. आजच्या दिवशी तुमची कार्यकुशलता खुप उच्च असेल. ज्यामुळे तुमचे काम सर्वांच्या नजरेत भरेल आणि याचा लाभ तुम्हाला मिळेल.

मीन
आजच्या दिवशी तुमचे मन प्रसन्न राहिल. कार्यात यश मिळेल. दाम्पत्य जीवनात थोडा तणाव राहू शकतो. संततीसाठी वेळ खुप चांगली आहे. प्रेमात यश मिळेल. कायद्याविरोधात कोणतेही काम करू नका, अन्यथा अडचणीत येऊ शकता. नोकरीत स्थानांतर करण्याचे योग आहेत.