8 मार्च राशीफळ : रविवारच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल सूर्यदेवाची ‘कृपा’

पोलीसनामा ऑनलाईन टीम : मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी खुप चांगला आहे. प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील. प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवाल. दाम्पत्य जीवनात सुद्धा प्रेम आणि रोमान्सची संधी मिळेल. व्यापारात सरलता येईल आणि उत्पन्न वाढेल, ज्यामुळे मन आनंदीत होईल. नोकरी करत असाल तर भरपूर मेहनतीने काम पूर्ण करू शकाल, ज्यामुळे चांगले परिणाम दिसून येतील. आरोग्यसुद्धा चांगले राहिल. धर्माच्या कार्यात सहभागी व्हाल.

वृषभ
तुमच्यासाठी आजचा दिवस सामान्यापेक्षा चांगला आहे. कुटुंबाकडे लक्ष द्याल. कुटुंबातील लोकांची साथ आणि सहवास लाभेल. कामात उत्पन्न वाढेल. आरोग्य थोडे कमजोर राहिल, ज्यामुळे मानसिक तणाव वाढेल. कामात तुमची मेहनत तुम्हाला यश मिळवून देईल. भाग्य उजळलेले राहिल.

मिथुन
तुमच्यासाठी आजचा दिवस ठिक आहे. प्रवासासाठी दिवस अनुकूल आहे. प्रवासातून चांगले फळ मिळेल. आरोग्य चांगले राहिल. कामात अडथळे येणार नाहीत, ज्यामुळे आनंदी होऊ शकता. भाग्य थोडे कमजोर राहू शकते. यामुळे जास्त प्रयत्नानंतरच यश मिळेल. दाम्पत्य जीवनात तणाव दिसून येईल. प्रेमसंबंधासाठी दिवस खुप चांगला आहे. आज एखादी संपत्ती खरेदी करण्याचा विचार कराल.

कर्क
आजचा दिवस तुमच्यासाठी चढ-उताराचा आहे. चांगले भोजन कराल. मित्रांसोबत मौजमस्तीची संधी मिळेल. दाम्पत्य जीवनात समाधानाची वेळ आहे. कुटुंबाचेही संपूर्ण सहकार्य मिळेल. कामात केलेली मेहनत चांगले परिणाम घेऊन येईल. प्रेमसंबंधात आजचा दिवस थोडा कमजोर आहे. दाम्पत्य जीवनात चांगले परिणाम मिळाल्याने मन आनंदीत होईल.

सिंह
तुमच्यासाठी आजचा दिवस खुप चांगला आहे. तुमचे विचार आणि प्रगल्भता विकसित होईल आणि तुम्ही मजबूतीने प्रत्येक काम पूर्ण कराल, ज्यामुळे यश मिळेल. तुमच्या योजना यशस्वी होतील. भाग्याची साथ मिळाल्याने योजना यशस्वी होतील. प्रेमसंबंधासाठी दिवस कमजोर आहे. दाम्पत्य जीवनासाठी दिवस चांगला आहे. कामात केलेले प्रयत्न यश देऊन जातील. नोकरीत बदलीचे योग तयार होतील.

कन्या
आजचा दिवस थोडा कमजोर आहे. आरोग्यात थोडी घसरण होईल तसेच मानसिकदृष्ट्या तणाव वाढेल. खर्चात अचानक वाढ होईल, ज्यामुळे आर्थिक स्थितीवर दबाव येईल. खर्चाचे योग्य नियोजन करता येणार नाही. कौटुंबिक जीवनात काही अडचणी येतील. कामात केलेले प्रयत्न सार्थकी लागतील. दाम्पत्य जीवनासाठी दिवस चांगला आहे. जोडीदार त्याच्या जबाबदार्‍या योग्यपद्धतीने पार पाडेल. प्रेमसंबंधात ओढाताण सुरूच राहिल.

तुळ
आजचा दिवस खुप चांगला आहे. तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होईल, ज्यामुळे मन आनंदीत होईल. कामात यश मिळेल आणि कुणी पैसे उधार घेतले असतील तर परत मिळतील. यामुळे आर्थिकस्थिती चांगली होईल. दाम्पत्य जीवनात प्रेम वाढेल आणि रोमान्सचे क्षण अनुभवाल. तिथयात्रेला जाण्याचे योग आहेत. प्रेमसंबंधासाठी आजचा दिवस सामान्य आहे. कामात चांगले परिणाम मिळतील, पण सर्व लक्ष कामावर केंद्रीत करावे लागेल, यामुळे बॉसदेखील खुश होईल.

वृश्चिक
तुमच्यासाठी आजचा दिवस चढ-उताराचा आहे. परंतु, बहुतांश परिणाम तुमच्या बाजूने असतील. कामात चांगले परिणाम दिसून येतील. भाग्याची साथ मिळेल. नोकरीत स्थानांतर होऊ शकते, परंतु तुमची स्थिती मजबूत राहिल. कामात चांगले परिणाम मिळाल्याने प्रत्येक काम यशस्वीपणे पूर्ण कराल. कुटुंबाचे वातावरण थोडा त्रास देऊ शकते. दाम्पत्य जीवनासाठी दिवस सामान्य आहे. प्रेमसंबंधात आज थोडे सावध राहा.

धनु
तुमच्यासाठी आजचा दिवस थोडा कमजोर आहे. काही गोष्टीमुळे चिंतामग्न राहाल आणि आरोग्यसुद्धा थोडे कमजोर होऊ शकते. दाम्पत्य जीवनात वाद होऊ शकतात. कामात परिणाम खुप चांगले मिळतील आणि सोबत काम करणार्‍यांचे चांगले सहकार्य मिळेल. कुटुंबात आनंद राहिल. प्रेमसंबंधात आज रोमान्सची पूर्ण संधी मिळेल, दिवस चांगला आहे. प्रिय व्यक्ती एखादी भेट देऊ शकते.

मकर
आजचा दिवस चांगला आहे. काही नव्या विषयांवर काम कराल. दाम्पत्य जीवनासाठी दिवस उत्तम आहे. जोडीदारावर प्रेम कराल. प्रेमसंबंधासाठी दिवस थोडा कमजोर आहे. खर्च वाढलेला राहिल. कुटुंबातील वातावरण खुप चांगले राहिल. प्रेमभावना वाढेल. कामात चांगले परिणाम मिळाल्याने तुमचा आनंद ओसंडून वाहिल.

कुंभ
आजचा दिवस कमजोर आहे. खर्च वाढतील. तणाव वाढेल. ऑफिसमध्ये कामाचा भार खुप वाढणार आहे, ज्यामुळे थकवा जाणवेल. मानसिक तणावसुद्धा जाणवेल. उत्पन्नात थोडी घट होऊ शकते. प्रेमसंबंधासाठी आजचा दिवस सामान्य आहे. दाम्पत्य जीवनात आनंद राहिल. जोडीदार तुम्हाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करेल. व्यापारात यश मिळाल्याने मन आनंदित राहिल.

मीन
तुमच्यासाठी आजचा दिवस कमजोर आहे. खर्च वाढेल आणि मानसिक तणावसुद्धा वाढेल. कामात चांगले परिणाम मिळाल्याने आत्मविश्वास वाढेल. उत्पन्न वाढल्याने तुमच्या आशा वाढतील. दाम्पत्य जीवनासाठी दिवस थोडा कमजोर आहे. जोडीदार आजारीसुद्धा पडू शकतो. प्रेमसंबंधासाठी आजचा दिवस सामान्य राहिल. प्रिय व्यक्ती एखाद्या गोष्टीवरून हट्ट करू शकते.