आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ‘सोनं-चांदी’ झाली स्वस्त, जाणून घ्या ‘हे’ आहेत भाव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मागच्याच महिन्यात सोन्या चांदीचे भाव चांगलेच वाढले होते. आता पुन्हा या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीचे भाव चांगेलच स्वस्त झाले आहेत. सोनं चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी ही चांगली बातमी आहे. आज दिल्लीत सोन्याच्या बाजारात सोन्याच्या किमतीत ३०० ने घट झाली आहे. यामुळे आता तुम्हाला १० ग्रॅम सोन्यासाठी ३९,२२५ रुपये मोजावे लागणार आहे. तज्ज्ञ लोकांच्या मते रुपया मजबूत झाल्यामुळे आणि सोन्याची मागणी कमी झाल्यामुळे भाव घटले आहेत. जागतिक स्तरावर न्यूयाॅर्कमध्ये सोनं १५०६ डाॅलर प्रति औंस आहे. तर चांदी १८.०५ डाॅलर प्रति औंस आहे.

सोन्या चांदीच्या दरांची घसरण
नवी दिल्लीत ९९.०९ टक्के सोनं ३०० रुपयांनी कमी झाले आहे. सोन्याच्या घसरणीबरोबर चांदीत सुद्धा घसरण दिसून आली आहे. चांदीमध्ये १४०० रुपयांनी घट झाली आहे. १ किलोग्रॅम चांदीची किंमत ४८,५०० रुपये झाली आहे. सिक्का कारभाऱ्यांमध्ये लिलाव कमी झाल्यानं चांदी घसरली असे समजत आहे.

दिवाळीमध्ये सोन्याचे दर असे असतील
या वर्षीच्या दिवाळीपर्यंत म्हणजे पुढच्या महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर १ हजार ५०० डॉलरवर जाण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेतील दरांवर होऊ शकतो. भारतातील सोन्याचा दर दिवाळीपर्यंत ३६,००० हजारच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर चांदीचे दर ४२,००० हजारपर्यंत जाण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या दरावर फेडरल रिझर्व्ह बँकेचे व्याज दर, अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेला तणाव या सर्व गोष्टींचा परिणाम होऊ शकतो असं तज्ज्ञांचे मत आहे. या दिवाळीत सोने ३८,००० हजारावर जाण्याची शक्यता आहे. तर चांदीचे दर ४५,००० हजारावर पोहोचू शकतात असे अंदाज वर्तवले जात आहेत.