SC च्या निर्णयावरून पुण्यातील तरुण आक्रमक; मराठा समाजाच्या प्रत्येक माणसांसाठी आजचा काळा दिवस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   मराठा समजाविषयीचा राखून ठेवलेला महत्त्वाचा निकाल आज सुप्रीम कोर्टाने जाहीर केला. त्यावर सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द करत एक मराठा समाजाला धक्का दिला. कोर्टाच्या निर्णयावरून पुण्यातील मराठा समाजातील तरुण आक्रमक झाले आहेत. तरुणांनी पुण्यात काळ्या फिती लावून आंदोलन केले आहे. तर आजचा दिवस मराठा समाजाच्या प्रत्येक माणसासाठी काळा दिवस आहे. अशा प्रतिक्रिया देखील मराठा समाजातील तरुण देत आहेत.

राज्य सरकारकडून तयार करण्यात आलेला मराठा आरक्षणाचा कायदा सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आला आहे. मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार याकडे आख्या महाराष्ट्र राज्याचे लक्ष लागून होते. सुप्रीम कोर्टाच्या निकलावरून हा निकाल अन्यायकारक असल्याचे पुण्यातील मराठा समाजातील तरुणांनी म्हटले आहे. तसेच, राज्य आणि केंद्र सरकारने तरुणांचा अजिबात विचार केला नाही. या ३२ वर्षाच्या लढ्याला अपयश आले आहे. सरकारने या आंदोलनात आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करू नये. नाहीतर मराठा क्रांती मोर्चा पुन्हा आक्रमक होईल असा इशारा देखील यावेळी तरुणांकडून देण्यात आला आहे.

तसेच, मराठा आरक्षण हे संविधान पद्धतीने आम्हाला मिळायला पाहिजे होते. ते मिळाले नाही. या निर्णयात दोन्ही सरकारच काळबेर आहे. कोरोना काळात हा निकाल देण्याची घाई सरकारला का झाली होती. असा सवाल देखील तरुणांनी यावेळी उपस्थित केलाय. आता मराठा तरुण रस्त्यावर उतरतील. सरकारच आम्हाला आंदोलन करण्यासाठी प्रवृत्त करत आहे. नंतर पुन्हा गुन्हा दाखल करण्यास ते तयार आहेत. या दरम्यान, मराठ्यांच्या विरोधात हा निकाल दिला गेल्याचे ठाम मत व्यक्त करत, म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा डोळ्याला काळी पट्टी बांधून दिला आहे. अन्य राज्यातही ५० टक्के आरक्षण असताना फक्त मराठा समाजाचे आरक्षण ५० टक्केच्या वर जाते म्हणून रद्द करणे. हा नक्कीच भेदभाव करणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. राज्य आणि केंद्र सरकार दोघांच्या मांडणीत कमतरता असेल. मात्र निकाल हा घटनादुरुस्ती मध्ये आरक्षण ५० टक्केच्या वर जातंय म्हणून होता. बाकीच्या राज्यात आरक्षणे ५० टक्केच्या पुढे गेली आहेत. ती का नाही रद्द केली. असा सवाल देखील उपस्थित करण्यात येत आहे.