बॉलिवूडची स्टार ‘कतरिना कैफ’ पस्तीशीत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील ब्युटीफुल गर्ल आणि अभियानाने सर्वांना वेड लावणारी अभिनेत्री कतरिना कैफचा आज वाढदिवस आहे. कतरिना आज 35 वर्षांची झाली आहे. जुलै १९८४ रोजी हाँगकाँगमध्ये कतरिनाचा जन्म झाला. कतरिनाचे वडील मोहम्मद कैफ हे काश्मिरी वंशाचे ब्रिटीश व्यावसायिक आहेत आणि तिची आई सुझेन कैफ वकील आहेत . कतरिनाला सहा बहिणी आणि एक भाऊ आहेत.

बॉलिवूडमध्ये एक यशस्वी अभिनेत्री होण्याआधी कतरिनाने अनेक मॉडेलिंग शो केले.जेव्हा ती भारतात आली होती त्यावेळी कतरिनाला हिंदी बोलता येत नव्हते. कि तिला अभिनयही नीट करता येत नव्हता. तरीही तिने आपल्या अभिनय क्षेत्रात यशस्वी कामगिरी केली आहे. अशा साऱ्या गोष्टींवर मात करत कतरिनाने बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले. तिने सुरुवातीला तेलुगू आणि मल्याळमअश्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या होत्या. त्यानंतर तिने हिंदी शिकत हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. आणि ती यशस्वी सुद्धा झाली. मॉडेलिंग ते बॉलिवूड असा कतरिनाचा प्रवास खरचं थक्क करणार आहे.चित्रपटसृष्टीत कतरिनाला ‘कॅट’ या नावाने ओळखले जाते.

[amazon_link asins=’B0756Z242J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’602fff02-88e0-11e8-986f-e781475afe06′]

कतरिनाच्या करिअरची सुरूवात मल्याळम चित्रपटापासून झाली. २००३ साली दिग्दर्शक कैझाद गुस्ताद यांच्या ‘बूम’ सिनेमातून कतरीनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तिने महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केले. तर २००४ साली कॅटरिना ‘मल्लीस्वरी’ या मल्याळम चित्रपटात झळकली

कतरिनाचे सुपरहीट चित्रपटांमध्ये काम केले आहे. करिअरच्या दुसऱ्या वर्षी कॅटरिनाने सलमान खान बरोबर ‘मैंने प्यार क्यों किया’ चित्रपटात काम केले. त्यानंतरच या दोघांतील प्रेमसंबंधांच्या चर्चांना उधाण आलं. कतरिनाने त्या नंतर अनेक चित्रपटात काम केले.पार्टनर, रेस, सिंग इज किंग, वेलकम, जब तक है जान, राजनीति,ज़िंदगी न मिलेगी दोबारा, मेरे ब्रदर की दुल्हन आणि एक था टाइगर सारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम करत तिने स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. कतरीना वर सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.