अहमदनगर : मुख्यमंत्री फडणवीस आज शिर्डीत !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज शिर्डी दौऱ्यावर येत आहेत. शिर्डीत सरपंच मेळाव्यासह विविध कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत. दुपारी दोन वाजता त्यांचे आगमन होईल.

शिर्डीत आज राज्यभरातील सरपंच व उपसरपंच आजचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात सरपंच व उपसरपंच यांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून जाहीर केली जाईल, अशी अपेक्षा आहे. सरपंच मेळाव्यासह वृक्षलागवड, शिर्डी पोलीस ठाण्याच्या विस्तारित इमारतीचे भूमिपूजन व इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री फडणवीस यांचे जिल्ह्यात आगमन होईल. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता ते मुंबईकडे पुन्हा रवाना होतील.

राजकीय विधानाकडे लक्ष
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड यांच्यासह अनेक जण भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस नेमके जिल्ह्यातील राजकारणाच्या दृष्टीने कोणते राजकीय भाष्य करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे त्यांचा दौरा राजकीय स्वरूपाचा नसला, तरी त्यांच्या राजकीय विधानाची अनेकांना उत्सुकता लागली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

७ दिवसात आत जाऊ शकते पोट, ‘हे’ ११ उपाय आहेत ‘रामबाण’
आरोग्य समस्यांवर ‘हे’ १० छोटे-छोटे घरगुती उपाय, जाणून घ्या
भारतात HIV पेक्षाही ‘हिपॅटायटीस’ अधिक घातक, पावसाळ्यात विशेष काळजी घ्या
‘सेक्स पॉवर’ कमी झाल्यास बिघडू शकते वैवाहिक जीवन, करा ‘हे’ खास उपाय
अशाप्रकारे परत मिळू शकते त्वचेची चमक, ‘हे’ ४ उपाय आवश्य करा
औषधी न घेता आहाराने लिव्हर ठेवा ठणठणीत, जाणून घ्या ११ उपाय