खुशखबर ! भाऊबीजेच्या दिवशी सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी ‘घट’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाऊबीजला सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घट झाली आहे. मंगळवारी दिल्लीच्या सराफ बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 548 रूपयांनी कमी झाला आहे. सोन्याबरोबरच चांदीच्या भावात देखील घसरण झाली आहे. चांदीची किंमत 1 हजार 190 रूपयांनी प्रति किलोग्रॅमनं कमी झाली आहे. जाणकारांच्या मते ग्लोबल ट्रेंड कमी झाल्यानं राजधानी दिल्लीमध्ये सोन्या-चांदीच्या दरात कपात झाली आहे.

सोन्याची नवीन किंमत
मंगळवारी दिल्लीच्या सराफ बाजारात सोन्याच्या किंमतीत 548 रूपयांची घट झाली असून प्रति 10 ग्रॅम सोनं 38 हजार 857 रूपये झालं आहे. दरम्यान, मागच्या आठवडयात शुक्रवारी सोनं 39 हजार 405 रूपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत पोहचलं होतं. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 1493 डॉलर तर चांदी 18.77 डॉलर प्रति औंस (28.349 ग्रॅम) झालं आहे.

Image result for gold

चांदीची चमक देखील पडली फिक्की
सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरात देखील घट झाली आहे. चांदीमध्ये 1 हजार 190 रूपयांची घट होऊन चांदी 47 हजार 90 रूपये प्रति किलोग्रॅम झाली आहे. एचडीएफसी सिक्योरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितलं की, दिवाळीच्या नंतर ग्लोबल मार्केटमध्ये घसरण आल्यानं दिल्ली सराफ बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव घसरला आहे. भाऊबीजमुळे अहमदाबादमध्ये स्टॉप मार्केट बंद असल्यानं दिवाळीच्या सुट्टयांमुळं सोन्याची मागणी घटली आहे.

Related image

धनतेरसला सोन्या-चांदीची विक्री 40 टक्क्यांनी घसरली
घटलेली मागणी आणि वाढलेल्या किंमतीमुळं धनतेरस दिवशी देखील सोन्या-चांदीच्या विक्रीत 40 टक्क्यांची घसरण झाल्याचा अंदाज आहे. धनतेरसच्या दिवशी सोन्या-चांदीसह इतर मौल्यवान वस्तु खरेदी करणं शुभ मानलं जातं. दरम्यान, दागिन्यांचा व्यापार करणार्‍यांच्या म्हणण्यानुसार, यंदा देशभरातील बहुसंख्य बाजारात मंदावलेलं वातावरण पहावयास मिळालं. व्यापार्‍यांनी यंदा ग्राहकांच्या संख्येत कमी झाल्याचं तसेच ग्राहकांनी त्यांच्या खर्चात कपात केल्याचं देखील सांगितलं.

gold

Visit : Policenama.com