सोन्या-चांदीच्या दरांनी पुन्हा गाठला नवीन विक्रम ; ही ५ आहेत भाववाढीची कारणे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज (गुरुवार) सोन्या-चांदीच्या भावात पुन्हा वाढ दिसून आली असून सोन्याच्या किंमतींनी आतापर्यंतचा सर्वोच्च आकडा गाठला आहे. ही वाढ १५० रुपयांनी झाली असून दिल्ली सराफा बाजारात सोन्याची किंमत ३८,९७० इतक्या झाल्या आहेत. त्याचबरोबर चांदीच्या किमतींतही ६० रुपयांची वाढ होऊन चांदी ४५,१०० प्रति किलो इतकी झाली आहे. सराफांच्या मागणीत वाढ झाल्यामुळे ही किंमतवाढ दिसून येत आहे. तथापि, जागतिक बाजारात मात्र सोन्या-चांदीच्या किंमती कमी झाल्या आहेत.

ही आहे सोन्याची किंमत
दिल्ली सराफा बाजारातील सोन्याच्या किंमती १५० रुपयांनी वाढून ३८,९७० रुपये प्रतितोळा झाल्या झाल्या आहेत जो आतापर्यंतचा विक्रमी आकडा आहे. आठ ग्रॅम गिन्नीचा भाव मात्र २८,८०० रुपयांवर स्थिर आहे.

४५ हजारांच्या पलीकडे चांदी
चांदीमध्ये देखील ६० रुपयांची किरकोळ वाढ नोंदली गेली आणि ४५,१०० रुपये प्रतिकिलो इतकी झाली. भविष्यात किंमती वाढण्याच्या अपेक्षेने चांदीचे वायदे अधिकच्या २१० रुपयांनी विकून ४३,६३० रुपयांवर होते. तर चांदीच्या नाणेबाजारामध्ये लिवाली आणि बिकवाली यांच्या किमती मात्र अनुक्रमे ९१ हजार आणि ९२ हजारांवर स्थिर होत्या.

ही आहेत सातत्याने भाववाढीची कारणे
१. भारतीय रिझर्व्ह बँकेने सोन्याची खरेदी वाढवली असून जगभरातल्या देशांच्या केंद्रीय बँका पुढच्या काही महिन्यांत ३७४ मेट्रिक टन सोन्याची खरेदी करतील, असे कळत आहे. ही मागणी वाढल्यामुळे सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली. आरबीआय ने मार्च २०१८ पासून आतापर्यंत ६० टन सोन्याची खरेदी केली आहे.

२. अमेरिका आणि चीनमधल्या व्यापारयुद्धामुळे जागतिक स्तरावर व्यापार मंदावला असल्यामुळे आशियाई देशातलं चलन कमकुवत झालं आहे. त्यामुळे सोन्याला मागणी वाढली असून किमती वाढत आहेत.

३. अमेरिका-इराणमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर नागरिक सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्याकडे बघत आहेत त्यामुळे मागणी वाढत आहे.

४. मागील ११ वर्षांत अमेरिकेने पहिल्यांदाच व्याजदरात कपात केली आहे. अमेरिकेने व्याजदरात कपात केल्यानंतर सोन्याचे भाव वाढतात. सध्याही तीच परिस्थिती असून किमती सातत्याने वाढत आहेत.

५. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि वर्ल्ड बँकच्या अहवालात जागतिक स्तरावर आर्थिक वाढ खुंटल्याचे म्हटले असून जागतिक अर्थव्यवस्थेत मंदीची परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत लोक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहतात. त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like