खुशखबर ! सलग तिसर्‍या दिवशी सोन्याच्या दरात ‘घट’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय स्तरावर किंमत घसरल्याने देशांतर्गत बाजारात पुन्हा सोने स्वस्त झाले आहे. शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव ९४ रुपयांनी कमी झाला आहे. तर याच दरम्यान चांदीच्या भावात ७८२ रुपये प्रति किलोग्रॅमने वाढ झाली आहे. मात्र तज्ञांचा अंदाज आहे की, येणाऱ्या दिवसात पुन्हा सोन्याच्या भावात घट होईल. मागील सत्रात सुरुवातीच्या व्यापारात डॉलर निर्देशांकात बळकट झाल्याने सोन्या-चांदीत घट नोंदवली गेली. पण बेरोजगारी आणि मॅन्युफॅक्चरिंग निर्देशांकात कमकुवत आकडेवारीमुळे आर्थिक रिकव्हरीच्या आशेला धक्का बसला. याच कारणामुळे सोने व चांदीच्या दरात खालच्या पातळीवरुन खरेदी दिसून आली.

सोन्याचा नवीन भाव
एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार, शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात ९९.९ टक्के शुद्ध सोन्याचा भाव ५३,०८४ रुपये प्रति १० ग्रामवरून ५२,९९० रुपये प्रति १० ग्रामवर आला आहे. या दरम्यान किंमतीत ९४ रुपये प्रति १० ग्रामने घट झाली आहे. तसेच मुंबईत ९९.९ टक्के सोन्याचा भाव घसरून ५२,३९० रुपये प्रति १० ग्रामवर आला आहे.

चांदीचा नवीन भाव
शुक्रवारी सोन्याच्या उलट चांदीच्या भावात वाढ झाली आहे. दिल्ल्लीत एक किलोग्रॅम चांदीचा भाव ६८,४८० रुपयांवरून ६९,२६२ रुपयांवर आला आहे. या दरम्यान किंमतीत ७८२ रुपये वाढ झाली आहे. तर मुंबईत चांदीचा भाव वाढून ६७,३९० रुपये प्रति ग्रामवर आला आहे.