दिवाळीपूर्वी 700 रुपयांपर्यंत ‘स्वस्त’ सोनं खरेदीची ‘सुवर्ण’संधी, 3 मोठे फायदे देखील मिळणार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या अगोदरच सोने केंद्र सोने खरेदी करण्याची केंद्र सरकार मोठी संधी देत आहे. केंद्र सरकारच्या ‘सॉवरेन गोल्ड बॉन्ड’ योजना 2019 च्या सहाव्या मालिकेत आजपासून गुंतवणूक करता येणार आहे. आपण सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करण्याचीही योजना आखत असाल तर आपल्याला त्यामध्ये 21 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर दरम्यान गुंतवणूक करण्याची उत्तम संधी आहे.

या गोल्ड बाँडमध्ये किमान गुंतवणूक 1 ग्रॅम सोन्यासाठी करता येऊ शकते. सराफा बाजारात सोन्याची किंमत दहा ग्रॅमच्या आसपास 39,000 रुपये आहे. त्याचबरोबर सरकारी बाँड योजनेत सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 38,350 रुपये ठेवण्यात आली आहे. जर आपण 10 ग्रॅम सोने खरेदी केले तर त्याची किंमत 38,350 रुपये आहे. तसेच ऑनलाईन 50 रुपयांची सूट आहे. या योजनेत तुम्हाला 10 ग्रॅम सोने 37,850 रुपयांना मिळेल.

ऑनलाईन गुंतवणूकीवर 50 रुपये प्रति ग्रॅम सूट –

रिझर्व्ह बँकेने यावेळी एक ग्रॅम सोन्याच्या बाँडची किंमत 3,835 रुपये ठेवली आहे. यात ऑनलाइन गुंतवणूक करणार्‍या गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट मिळेल. ऑनलाइन गुंतवणूक करणार्‍या गुंतवणूकदारांसाठी सोन्याच्या बाँडची किंमत प्रति ग्रॅम 3,785 रुपये असेल.

नोव्हेंबर 2015 मध्ये सॉवरन गोल्ड बाँड लॉन्च –

सरकारने नोव्हेंबर 2015 मध्ये सर्वप्रथम सॉवरेन गोल्ड बाँड लाँच केले. हा गोल्ड बाँड जारी करण्यामागील सरकारचा हेतू बाजारातल्या सोन्याची मागणी कमी करणे हा होता.

सॉवरेन गोल्ड बाँडविषयी –

सॉवरेन गोल्ड बॉन्डची सर्वात महत्वाची बाब म्हणजे सोन्याच्या किंमती वाढल्या की आपल्याला थेट फायदा मिळतो. एवढेच नव्हे तर त्याला वर्षाकाठी 2.5 टक्के व्याजही मिळते. हे व्याज 6 महिन्यांत दिले जाते.

Visit  :Policenama.com