20 August Rashifal : कर्क, सिंह आणि मीनसह या २ राशीवाल्यांची होईल इच्छापूर्ती, वाचा दैनिक राशीभविष्य

नवी दिल्ली : ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन कुंडली दैनंदिन घडामोडींचे भाकीत करते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक कुंडली अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचे भविष्य सांगतात. दैनिक राशिफळ (Dainik Rashifal) हे ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींवर आधारित एक जन्मकुंडली आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) दैनंदिन अंदाज स्पष्ट केले जातात. ही कुंडली काढताना ग्रह नक्षत्रांसह पंचांगाच्या हिशोबाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे नाते, आरोग्य आणि दिवसभर घडणाऱ्या शुभ-अशुभ घटनांचे भाकीत करते. हे राशीभविष्य वाचून तुम्ही तुमच्या दैनंदिन योजना यशस्वी करू शकता. उदाहरणार्थ, ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींच्या आधारावर, दैनंदिन कुंडली सांगते की आजचे तुमचे ग्रह-तारे तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही. आज आपल्याला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात हे समजू शकते. दैनंदिन कुंडली वाचून, तुम्ही दोन्ही परिस्थितींसाठी (संधी आणि आव्हाने) तयार राहू शकता.

मेष (Aries Daily Horoscope)
आजचा दिवस सकारात्मक परिणाम देईल. मालमत्तेशी संबंधित कामासाठी अनुभवी व्यक्तीशी बोला. व्यवसायात मोठा निर्णय घेणे टाळा. नोकरी अथवा कामाबद्दल चिंतेत असाल तर चांगली बातमी ऐकायला मिळेल. तब्येतीच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा मोठा आजार होऊ शकतो. व्यावसायिक योजनांचा पूर्ण लाभ घ्याल.

वृषभ (Taurus Daily Horoscope)

आजचा दिवस विचार केलेली कामे पूर्ण करण्याचा आहे. अनावश्यक भांडणे आणि वादांपासून दूर राहा. तुमचे बोलणे कुटुंबातील लोकांना वाईट वाटू शकते. जुनी चूक उघड होऊ शकते. संततीच्या प्रगतीच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे लागतील. मालमत्ता खरेदी करताना डोळे आणि कान उघडे ठेवा, अन्यथा चूकीच्या ठिकाणी सही करू शकता.

मिथुन (Gemini Daily Horoscope)
दिवस ठीक आहे. नवीन काम सुरू करू शकता. तब्येतीची समस्या दूर होईल. नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करत राहाल. कुटुंबात नवीन पाहुणा येईल. परदेशातील नातेवाईकाकडून चांगली बातमी मिळेल. कुटुंबातील सदस्याच्या निवृत्तीमुळे सरप्राईज पार्टीचे आयोजन करू शकता.

कर्क (Cancer Daily Horoscope)
आजचा दिवस काही खास करण्याचा आहे. जोडीदारासोबतचे मतभेद दूर होतील. नातेवाईकांच्या घरी मेजवानीसाठी जाऊ शकता. एखाद्याच्या मदतीसाठी पुढे जाल. मालमत्तेशी संबंधित वाद होऊ शकतो. व्यवसायासाठी पैसे उधार घेण्याचा विचार करत असाल तर ते सहज मिळतील. प्रगतीचे मार्ग खुले होतील. एकापेक्षा जास्त स्त्रोतांकडून उत्पन्न मिळेल.

सिंह (Leo Daily Horoscope)

व्यवसायाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. एखादा सहकारी गोड बोलण्याने फसवू शकतो. आवडती वस्तू हरवली असेल तर ती मिळेल. घरी नवीन वाहन आणण्याचा विचार करत असाल, तर थोडे दिवस थांबा. वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या, अन्यथा त्यांना शारीरिक त्रास होऊ शकतो. प्रगतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील.

कन्या (Virgo Daily Horoscope)
आजचा दिवस धावपळीचा आहे. जास्त धावपळ केल्यामुळे, एखादा हंगामी आजार होऊ शकतो. व्यवसायात नुकसान होऊ शकते. नोकरीत कामाचा ताण वाढल्याने त्रास होईल. दुस-याच्या बोलण्यात अडकून कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका. प्रगतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून निराशाजनक माहिती ऐकू येईल.

तूळ (Libra Daily Horoscope)
मोठ्या गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. जोडीदारासोबत झालेले मतभेद दूर होतील. कुटुंबातील व्यक्तीच्या वागणुकीमुळे त्रास होईल. काही कठोर शब्द ऐकायला मिळतील. कुटुंबातील एखाद्या सदस्याला नोकरीसाठी दूर जावे लागेल. भावाच्या किंवा बहिणीच्या लग्नातील अडचणीसाठी नातेवाईकांशी बोला, तरच त्या दूर होतील.

वृश्चिक (Scorpio Daily Horoscope)

आजचा दिवस शुभकार्यात सहभागी होण्याचा आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून चांगला नफा मिळू शकतो. वादविवादापासुन दूर राहा. आजूबाजूच्या वादात पडणे टाळा. घरी पूजा-पाठ आयोजित करू शकता. संततीच्या भवितव्यासाठी बचतीची योजना बनवावी लागेल. जुन्या मित्रासोब वाद होऊ शकतो.

धनु (Sagittarius Daily Horoscope)
आजचा दिवस चढ-उतारांचा आहे. व्यवसायात किंवा नोकरीत असलेले वाद दूर होतील.
काही लोकांपासून अंतर ठेवावे लागेल.  एखाद्याला दिलेले पैसे परत मिळतील.
नवीन वाहन घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल. मनापासून लोकांचा चांगला विचार कराल, पण लोक तो तुमचा स्वार्थ समजतील.
आई-वडिलांना कुठेतरी घेऊन जाण्याची योजना आखाल. विरोधक कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील, यापासून बचाव करावा लागेल.

मकर (Capricorn Daily Horoscope)
आज व्यवहारात सावधगिरी बाळगा. प्रवासात वाहन जपून चालवा, अपघात होण्याची भीती आहे.
कुटुंबातील सदस्याची तब्येत बिघडल्यामुळे अडचणी येतील. खूप दिवसांनी एखादा जुना मित्र भेटेल.
शिक्षकांशी अभ्यासातील समस्यांबद्दल बोला. महत्वाच्या कामात हलगर्जीपणा टाळा.

कुंभ (Aquarius Daily Horoscope)

अनावश्यक काळजी करणे टाळा. आर्थिक स्थिती मजबूत राहील.
व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल, ज्यामुळे आनंद होईल. कोणाकडे कर्ज मागितले तर ते सहज मिळेल.
संततीच्या करिअरबद्दल मन थोडे दु:खी असेल. परंतु घाईगडबडीत कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका.
शिक्षणात अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. कुटुंबातील एखाद्या सदस्याला दिलेले वचन पूर्ण करावे लागेल.

मीन (Pisces Daily Horoscope)
आजचा दिवस संमिश्र आहे. कार्यक्षेत्रात काहीतरी नवीन करून दाखवण्याच्या प्रयत्नात राहाल.
कुटुंबातील सदस्यांना तुमचे एखादे बोलणे वाईट वाटेल. जोडीदारासोबत असलेले मतभेद दूर होतील.
एखाद्या मित्रासोबत नवीन कामाची सुरुवात करू शकता.
नोकरदार लोक पार्ट टाइम काम करण्याचा विचार करत असतील तर त्यांची इच्छा पूर्ण होईल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MNS Chief Raj Thackeray | ‘…तेव्हा राग का आला नाही’, शरद पवारांचा उल्लेख करत भाजप मंत्र्याचा राज ठाकरेंना रोखठोक सवाल