भारताने ओलांडला 1 कोटी ‘कोरोना’ रूग्णांचा आकडा, व्हॅक्सीन अजूनही दूरच

नवी दिल्ली : भारताने एक कोटी कोरोना रूग्णांचा आकडा पार केला आहे. शुक्रवारी रात्री कोरोना रूग्णांची संख्या 10,004,825 झाली होती. महामारीमुळे देशात आतापर्यंत सुमारे 1 लाख 45 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय प्रकरणांची संख्या सुमारे सव्वा तीन लाख आहे. परंतु भारतासाठी व्हॅक्सीन अजूनही दूरच आहे.

जगात काही देशांमध्ये लसीकरण सुरू झाले आहे, तर काही देश अजूनही व्हॅक्सीनची प्रतिक्षाच करत आहेत. अमेरिका आणि रशियासारख्या देशांनी व्हॅक्सीन विकसित करण्याचा दावा करून लसीकरण सुरू सुद्धा केले आहे. भारतात काही व्हॅक्सीनच्या ट्रायल अंतिम टप्प्यात आहेत. त्या काही आडवड्यात पूर्णपणे तयार होण्याचा दावा केला जात आहे.

दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, कोरोना व्हॅक्सिनेशन स्वेच्छेवर अधारित असेल. ज्यास लसीकरण करायचे असेल, त्यास रजिस्ट्रेशन करावे लागेल. मंत्रालयाने कोरोना व्हॅक्सीनशी संबंधीत विचारल्या जाणारे प्रश्नांची एक यादी तयार केली होती, ज्यावर एका-एकाचे उत्तर देण्यात आले आहे.

मंत्रालयाने म्हटले, कोविड व्हॅक्सिनेशन स्वेच्छेवर अधारित केले जाईल. मात्र, हा सल्ला दिला जात आहे की, व्हॅक्सीनचा पूर्ण डोस घ्यावा. यामुळे तुम्ही स्वताला आजारापासून दूर ठेवू शकता, सोबतच त्याचा प्रसारही थांबवू शकता. मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनेक व्हॅक्सीन आपल्या फायनल स्टेजच्या विविध टप्प्यात आहेत. भारत बायोटेक-आयसीएमआरसह 6 व्हॅक्सीनचा उल्लेख केला आहे.