मोठी ‘बॅटरी’ असलेल्या Realme C3 चा आज पहिला सेल, किंमत फक्त 6,999 रुपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रियलमी सी 3 हा भारातामध्ये नुकातच लाँच झाला आहे. आज पहिल्यांदाच हा मोबाईल सेलमध्ये उपलब्ध करण्यात येत आहे. याआधी कंपनीने सी 1 आणि सी 2 बाजारात लाँच केले होते. हे दोन्ही फोन ग्राहकांच्या पसंतीस उतरले होते. आता रियलमी सी 3 हा फोन लाँच झाला असून आज हा फोन फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या अधिकृत साईटवरून खरेदी करता येणार आहे.

रियलमी सी 3 भारतात दोन पर्य़ायात उपलब्ध करण्यात आला आहे. ज्यामध्ये 3 जीबी रॅम प्लस 32 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅम प्लस 64 जीबी स्टोरेजचा समावेश आहे. कंपनीने हा फोन लाँच केला त्यावेळी 3 जीबी रॅमच्या फोनची किंमत 6 हजार 999 रुपये तर 4 जीबी रॅम फोनची किंमत 7 हजार 999 रुपये ठेवली आहे. रियलमी 3 या फोनच्या खरेदीवर जिओकडून 349 च्या प्लॅन सोबत 7 हजार 550 रुपयांचा फायदा मिळणार आहे. फ्लिपकार्ट व कंपनीच्या अधिकृत साईट आणि ऑफलाईन स्टोअरवर या फोनची आज दुपारी बारा पासून विक्री सुरु झाली आहे.

रियलमी सी 3 मध्ये 6.5 इंचाचा डिस्प्ले असणार आहे. हे वॉटरड्रॉप स्टाइल नॉचसह आहे. या डिस्प्लेचा स्क्रीन टू बॉडी रेशियो 89.8 टक्के आहे. सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास देण्यात आला आहे. या फोनमध्ये Mediatek Helio G70 चिपसेट दिला गेला आहे. ऑक्टा कोर प्रोसेसर आहे. तसेच फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. यात 12 मेगापिक्सलचा प्रायरमी लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा लेन्स देण्यात आला आहे. युजर्सना फोनमध्ये फ्रंटमध्ये 5 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळणार आहे. या फोनमध्ये युजर्स एचडी व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येणार आहे. या फोनमध्ये 5000 एमएएच क्षमतेची बॅटरी मिळत आहे.

You might also like