आज आहे GSTR 3B, GSTR 5 रिटर्न भरण्याची शेवटची तारीख, जाणून घ्या का आणि कशासाठी भरणे आहे आवश्यक

नवी दिल्ली : गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स नेटवर्क म्हणजे (जीएसटीएन) अंतर्गत 20 फेब्रुवारीला जीएसटीआर 3बी आणि जीएसटीआर 5 भरण्याची तारीख आहे. व्यवसायिकांनी हा रिटर्न वेळेपूर्वी भरावा यासाठी अर्थमंत्रालयाकडून ट्विट करून माहिती दिली जात आहे. जर एखादा व्यवसायिक हे दोन्ही रिटर्न आज फाईल करू शकला नाही तर त्यास पेनल्टी भरावी लागेल. जीएसटीआर 3बी रिटर्न भरणे त्या व्यवसायिकांसाठी आवश्यक असते ज्यांचा वार्षिक टर्नओव्हर 5 कोटींच्या वर आहे.

यासोबतच जीएसटीआर 5 रिटर्न भरण्याची आज शेवटची तारीख आहे. जर आज रिटर्न भरला नाही तर व्यावसायिकांना पेनल्टी द्यावी लागेल. जीएसटीआर 5 रिटर्न नॉन रेसीडेंट्ससाठी असतो जे भारताच्या जीएसटी रिझीमच्या अंतर्गत रिजस्टर्ड असतात आणि ज्यांचा व्यवसायाचे ट्रांजक्शन भारतात सुद्धा होते.

ऑनलाइन सुद्धा भरू शकता रिटर्न
जीसटीआर 5 रिटर्न व्यवसायिक ऑनलाइन जीएसटीच्या पोर्टलवर सुद्धा भरू शकतात. नॉन रेसीडेट्स व्यवसायिकांसाठी ही सुविधा जीएसटी पोर्टलवर विशेषकरून दिली आहे. तसेच हे टॅक्स फेसिलेशन सेंटरवर जाऊन सुद्धा भरू शकता. जीएसटीआर 5 रिटर्नच्या फॉर्ममध्ये व्यवसायिकांना आपल्या खरेदी आणि विक्रीच्या त्या सर्व डिटेल भरव्या लागतात ज्या त्यांनी या महिन्याच्या दरम्यान केली आहे.

काय आहे जीएसटीआर 3 बी रिटर्न
व्यवसायिकांना वर्षात चार जीएसटीआर-3बी आणि चार जीएसटीआर-1 रिटर्न दाखल करावे लागतात. जर हे रिटर्न वेळेवर भरले नाहीत तर यावर पेनल्टीची तरतूद आहे. जीएसटी प्रणालीच्या अंतर्गत रिटर्न भरण्याची प्रक्रिया सोपी बनवण्यासाठी जीएसटीआर 3बी फॉर्म सुरू केली. सरकारकडून हे पाऊल व्यवसायिकांना दिलासा देणे आणि देशभरात जीएसटीचे रोल-आऊट सुरळीत बनवण्यासाठी केले गेले होते. यामध्ये व्यवसायिकांना आपले इनवर्ड आणि आऊटवर्ड सप्लाय घोषीत करावे लागते.