Petrol and Diesel Price : सलग 19 व्या दिवशी इंधनाचे दर वाढले, पेट्रोल 0.16 तर डिझेल 0.14 पैशांनी महागले, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पेट्रोल-डिझेलच्या दरात लागोपाठ 19 व्या दिवशी वाढ झाल्याने आता डिझेलचे दर पेट्रोलच्या दराच्या वर गेले आहेत. सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी गुरूवारी पेट्रोलच्या दरात 16 पैशांची वाढ केली. तर डिझेलच्या दरात देशाभरात 14 पैशांची वाढ करण्यात आली आहे. आजच्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लीटर 86.70 रूपये असून डिझेल 78.34 रूपये प्रति लीटर दराने विकले जात आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत प्रथमच डिझेलचे दर पेट्रोलपेक्षा जास्त झाले आहेत.

पेट्रोल-डिझेलचे अनुक्रमे दर

मुंबई           86.70 – 78.34
पुणे             86.73 – 77.21
ठाणे            86.20 – 76.68
अहमदनगर  87.11 – 77.56
औरंगाबाद   87.78 – 79.43
धुळे            86.60 – 77.08
कोल्हापूर    86.64 – 77.16
नाशिक       86.25 – 76.75
रायगड       86.94 – 77.39

मूल्यवर्धित करामुळे (वॅट) विविध राज्यात इंधनाचे दर वेगवेगळे आहेत. सध्या केवळ दिल्लीत डिझेलचे दर पेट्रोलच्या दरापेक्षा जास्त झाले आहेत.

जाणून घ्या किती आहे उत्पादन शुक्ल व अन्य कर
पेट्रोलच्या मुळ किमतीत कर 50.69 रुपये प्रति लीटर म्हणजेच 64 टक्के आहे. यामध्ये 32.98 रुपये केंद्रीय उत्पादन शुल्क आणि 17.71 रुपये स्थानिक विक्रीकर किंवा वॅट आहे. तर डिझेलच्या मुळ किमतीत कर सुमारे 63 टक्के म्हणजेच प्रति लीटर 49.43 रुपये आहे. यामध्ये 31.83 रुपये केंद्रीय उत्पादन शुल्क आणि 17.60 रुपये वॅट आहे.

तेल कंपन्या 7 जूनपासून इंधनाचे दर वाढवत आहेत
तेल कंपन्यांनी मे 2017 पासून आंतरराष्ट्रीय दरांच्या अनुषंगाने दररोज पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत सुधारणा करण्यास सुरवात केली. जूनपासून कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत दररोजचे बदल सुरू केले आहेत. मार्चच्या मध्यावर जेव्हा कोरोनामुळे जगभरात लॉकडाऊनची तयारी सुरू झाली होती, तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर खाली येत होते, तेव्हा सरकारने इंधनावर अतिरिक्त उत्पादन शुल्क लादले आणि महसूल वाढविण्यासाठी उपाययोजना केली.