Petrol and Diesel Price : ‘पेट्रोल-डिझेल’च्या किमती घालतायेत आकाशाला गवसणी, जाणून घ्या राज्यातील प्रमुख शहरातील दर

मुंबई : वृत्त संस्था  – पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत लागोपाठ दरवाढीचे सत्र सुरूच आहे. या दरम्यान एकुण पेट्रोलचे दर 8.50 रुपये आणि डिझेलचे दर 10.01 रुपये प्रति लीटरने वाढवण्यात आले आहेत. या इंधनांचे दर संपूर्ण देशात वाढवण्यात आले आहेत. बुधवारी (24 जून) रोजी मुंबईत पेट्रोल 86.54 रुपये प्रति लीटर तर डिझेल 77.76 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे.

पेट्रोल-डिझेलचे अनुक्रमे दर

मुंबई             86.54 – 77.76
पुणे               86.27 – 76.32
ठाणे             86.47 – 76.49
अहमदनगर    86.74 – 76.79
औरंगाबाद     86.79 – 76.83
धुळे              86.90 – 76.95
कोल्हापूर      86.56 – 76.63
नाशिक         86.90 – 76.94
रायगड          86.73 – 76.75

जाणून घ्या किती आहे उत्पादन शुक्ल व अन्य कर
पेट्रोलच्या मुळ किमतीत कर 50.69 रुपये प्रति लीटर म्हणजेच 64 टक्के आहे. यामध्ये 32.98 रुपये केंद्रीय उत्पादन शुल्क आणि 17.71 रुपये स्थानिक विक्रीकर किंवा वॅट आहे. तर डिझेलच्या मुळ किमतीत कर सुमारे 63 टक्के म्हणजेच प्रति लीटर 49.43 रुपये आहे. यामध्ये 31.83 रुपये केंद्रीय उत्पादन शुल्क आणि 17.60 रुपये वॅट आहे.

तेल कंपन्या 7 जूनपासून इंधनाचे दर वाढवत आहेत
तेल कंपन्यांनी मे 2017 पासून आंतरराष्ट्रीय दरांच्या अनुषंगाने दररोज पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत सुधारणा करण्यास सुरवात केली. जूनपासून कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत दररोजचे बदल सुरू केले आहेत. मार्चच्या मध्यावर जेव्हा कोरोनामुळे जगभरात लॉकडाऊनची तयारी सुरू झाली होती, तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर खाली येत होते, तेव्हा सरकारने इंधनावर अतिरिक्त उत्पादन शुल्क लादले आणि महसूल वाढविण्यासाठी उपाययोजना केली.