Petrol Diesel Price : ‘पेट्रोल-डिझेल’च्या दरात आज पुन्हा ‘घसरण’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज दुसर्‍या दिवशी घसरण झाली आहे. शुक्रवारी पेट्रोल 16 पैसे आणि डिझेल 14 पैसे प्रति लीटरने स्वस्त झाले आहे. इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार शुक्रवारी (6 मार्च 2020) दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईत पेट्रोल अनुक्रमे 71.14 रुपये, 76.83 रुपये, 73.82 रुपये आणि 73.91 रुपये प्रति लीटर दराने ग्राहकांना मिळत आहे. तर दुसरीकडे चार महानगरांमध्ये डिझेल अनुक्रमे 63.81 रुपये, 66.82 रुपये, 66.14 रुपये आणि 67.34 रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे.

पेट्रोल-डिझेलचे अनुक्रमे दर

पुणे 77.18 – 66.13
अहमदनगर 77.15 – 66.11
औरंगाबाद 77.48 – 66.42
धुळे 76.83 – 65.80
कोल्हापूर 77.06 – 66.04
नाशिक 76.59 – 65.56
रायगड 77.48 – 66.39

रोज सकाळी 6 वाजता ठरतात पेट्रोल-डीझेलचे दर

प्रत्येक दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ अथवा घट होत असते. ऑइल मार्केटिंग कंपनी रोज पेट्रोल – डिझेलच्या किमतींचे समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करते. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डॉलर्सचे भाव यावर ठरतात. मूळ किंमतींमध्ये अबकारी कर, डीलर कमीशन यांचा समोवश असतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीनुसार भारतात पेट्रोल-डिझेलचे दर बदलत असतात.

एसएमएसने मिळेल तुमच्या शहरातील इंधन दराची माहिती

तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घ्यायचे असल्यास त्यासाठी मोबाईल क्रमांक नोंदणीकृत करावा लागेल. या क्रमांकावर एसएमएसद्वारे तुम्हाला ही माहिती मिळू शकते. यासाठी एसएमएस पाठवण्यापूर्वी कोणत्याही पेट्रोल पंपावरून डीलर कोड घ्यावा लागेल. एसएमएस सुविधा मिळवण्यासाठी कोड आवश्यक आहे.

कंपनी आणि क्रमांकाची सुविधा

1 इंडियन ऑयल ग्राहक RSP<डीलर कोड 92249 9 2249

2 बीपीसीएल ग्राहक RSP<डीलर कोड 9223112222

3 एचपीसीएल ग्राहक HPPRICE<डीलर कोड 9222201122

वरील क्रमांकावर एसएमएस पाठवून तुम्ही तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घेवू शकता

1 एप्रिलपासून देशात विकेल जाईल BS-VI पेट्रोल-डिझेल
देशातील सार्वात मोठी ऑईल मार्केटिंग कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने शुक्रवारी म्हटले की, आता ते BS-VI इंधन पुरवठ्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. 1 एप्रिल 2020 पासून देशात BS-VI इंधनाचा वापर लागू होणार आहे. यासोबतच ग्राहकांना BS-VI इंधनासाठी थोडी जास्त किरकोळ किंमत चुकवावी लागेल.